Pik Vima Osmanabad 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी चे तसेच जखमीचे या बाबीच्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या द्वारे देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एकूण 36 महसूल मंडळांना सोयाबीन या पिकासाठी अग्रीम पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपनी ला निर्देशित केले आहे.

Pik Vima Osmanabad 2023 – : धाराशिव जिल्ह्यात मागील बऱ्याच दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्यामुळे पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पीक लागणार नाही म्हणजेच शेतकऱ्यांच्या पिकांचे 50% पेक्षा जास्त उत्पादनात घट येऊ शकते. याच्याच अनुषंगाने बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण शासनामार्फत करून नुकसान झाल्याचे निश्चित करून पुढील प्रमाणे 25% आगाव रक्कम अग्रीम पिक विमा म्हणून देण्यात येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पुढील प्रमाणे अग्रीम पिक विमा साठी पात्र असलेली महसूल मंडळे

उस्मानाबाद तालुक्यातील महसूल मंडळे पुढीलप्रमाणे – :

  • उस्मानाबाद शहर ,उस्मानाबाद ग्रामीण , आंबेजवळगे ,बेंबळी, करजखेडा, केशेगाव ,पाडोळी, ढोकी ,तेर ,येडशी, जागजी, तुळजापूर इत्यादी

तुळजापूर तालुक्यातील महसूल मंडळी पुढील प्रमाणे – :

  • तुळजापूर ,सलगर दि., सावरगाव, मंगळूर, आरळी बुद्रुक ,ईटकळ, तामलवाडी इत्यादी

उमरगा तालुक्यातील महसूल मंडळी पुढील प्रमाणे – :

  • उमरगा ,डाळिंब, बलसुर ,मुळज बेडगा ,मुरूम
    इत्यादी

लोहारा तालुक्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे – :


लोहारा, माकणी, जवळी, धानुरी इत्यादी

कळम तालुक्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे – :

  • येरमाळा ,मासा खं. ,शिराढोण, नायगाव इत्यादी

परंडा तालुक्यातील महसूल मंडळी पुढील प्रमाणे – :

  • परांडा ,अनाळा ,शेळगाव ,सोनारी इत्यादी

Beed 2023 | पिक विमा नुकसान भरपाई

Pik Vima Osmanabad 2023

वरील एकूण 36 महसूल मंडळातील सोयाबीन या पिकासाठी सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य पिक विमा नुकसान भरपाई रकमेच्या 25% आगाव रक्कम त्यांच्या खात्यात एक महिन्याच्या आत जमा करण्यात येईल.

Leave a comment

error: