100 रुपयांमध्ये जमीन वारसा हक्काची करा ऑनलाईन नोंदणी – ई हक्क प्रणाली

नमस्कार शेतकरी मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून शेती वारसा हक्काची नोंदणी व ऑनलाइन अर्ज कसा केल्या जातो याची सविस्तर माहिती पाहूया.

तलाठ्या शिवाय करा वारसानोंदणी घरबसल्या करा अर्ज 18 दिवसाच्या आत होईल नोंद

ई हक्क प्रणाली

शेतकरी बंधूंनो ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे तो व्यक्ती मृत्यू पावला तर त्याच्या नावावरील जमीन ही वारसांना मिळणे आवश्यक असते परंतु त्याकरिता वारसांची नोंद करणे आवश्यक असते.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तीन महिन्याच्या आत मध्ये वारसाना वारस नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. परंतु पहिले हे काम करण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जावई लागत होते आता हे काम करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Land Inheritance Right
कारण महाराष्ट्र सरकारच्या ई हक्क प्रणालीचा वापर करून तुम्ही घरबसल्या वारसांचीनोंद करण्यासाठी अर्ज करूशकता.

👉 ई हक्क प्रणाली 👇👇

–>ई हक्क प्रणाली म्हणजे शेतकऱ्यांना ऑनलाइन सुविधा पुरवण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून ती हक्क प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

–> ई हक्क प्रणालीच्या वापरातून शेतकऱ्यांना घरबसल्या 7 ते 8प्रकारचे फेरफार अर्ज देखील करता येतात.

–>सातबारा बोझा चढवणे उतरवणे

–>नावातील दुरुस्ती करणे.

–>वारसांची नोंद देखील करता येते.

–>इ करार करणे

वरील सर्व प्रकारच्या कामासाठी ई हक्क प्रणाली च्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता तसेच तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटसही चेक करता येते.

👉👉ऑनलाइन अर्ज कसा केल्या जातो ??

सर्वात सुरुवातीला bhulekh.mahabhumi.gov.in या साईटला क्लिक करून घ्या.

पुढे तुम्हाला एक सूचना दिसेल सातबारा दुरुस्तीसाठी इ हक्क प्रणाली अशी ही सूचना असून त्याच्याखाली आपल्याला एक लिंक दिसेल.

https://pdeigr.maharashtra.gov.in तिला क्लिक करा.

आता तुमच्यासमोर “पब्लिक डेटा एन्ट्री ” नावाने पेज दिसेल.

या ठिकाणी तुम्हाला proceed to Login ला क्लिक करा. आता तुम्हाला तुमचे अकाउंट सुरू करायचे आहे त्याच्यासाठी ” create new user ‘ याला क्लिक करा.

तुमच्यापुढे ‘New User Sign Up हे पेज ओपन होईल. या ठिकाणी सुरुवातीला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव आणि आडनाव टाकावं लागेल.

ही सर्व माहिती भरल्यानंतर लॉगिन डिटेल्स मध्ये user name टाका check Availability याला क्लिक करा. आणि पासवर्ड टाकून घ्या कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा पासवर्ड टाका. पुढे Security Questions यामधील एक प्रश्न निवडा व त्याचे उत्तर द्या.

सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर , पॅन कार्ड , ईमेल आयडी , राहत असलेल्या शहराचा पिन कोड ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर देश, राज्य आणि जिल्हा आपोआप दिसेल. Select city या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचे गाव निवडावे लागेल.

ऍड्रेस डिटेल्स मध्ये तुम्ही तुमच्या घराचा क्रमांक आणि रहात असलेल्या घराचे नाव टाकू शकता.

पुढे आता कॅपच्या टाकून घ्यायचा आहे जसा आहे तसा टाका. Save वर क्लिक करा.

आता तुमचे Registration Successful झाले आहे.

Please Remember Username & password for future Transaction. हा लाल अक्षरात तुम्हाला मेसेज दिसेल. त्यानंतर तुम्हाला Back याला क्लिक करा.

आता परत एकदा लॉगिन करावे लागेल. तुम्ही नोंदणी करताना टाकलेला युजरनेम व पासवर्ड तेथे टाकावा लागेल व कॅपच्या टाकायचा आहे शेवटी लॉगिन याच्यावर क्लिक करायचे आहे.

आता तुमच्यासमोर Details हे पेज ओपन होईल. Marriage, e-filing , 7/12 असे अनेक पर्याय दिसतील याचाच अर्थ असा या सेवा आता उपलब्ध झालेले आहेत.

7/12 mutations ह्याला क्लिक करा.

त्यानंतर वापरकर्त्याचा प्रकार निवडावा लागेल. बँकेचे कर्मचारी असाल तर user is bank
सामान्य नागरिक असाल तर user is citizenया पर्यायांवर click करा.

पुढे process याला क्लिक करा.

आता तुमच्या समोर ” फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क ” नावाचे page open होईल.

सुरुवातीला गावाची माहिती भरा. नंतर जिल्हा ,तालुका आणि शेवटी गाव निवडायचे आहे.

या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठ्या कडे जो फेरफार प्रकारा साठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा असा मेसेज तुम्हाला दिसतो.

तुम्हाला वारस नोंदणी करायची आहे म्हणून ” वारस नोंदणी ” या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर वारस फेरफार अर्ज ओपन होईल तिथे तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती भरावी लागेल त्यामध्ये अर्जदाराचे नाव वडील किंवा पतीचे नाव आडनाव अर्जदाराचा ई-मेल शेवटी मोबाईल नंबर टाका. ” पुढे जा ” याला click करा.

तुमचा अर्ज मसुदा जतन केला आहे. व अर्ज क्रमांक दिसेल या मेसेजच्या खाली ok त्याला क्लिक करा.

पुढे तुम्हाला मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकावा लागतो तसेच सातबारा उताऱ्यावरील खाते क्रमांक इथे टाकावा लागेल. “खातेदार शोधा” याला क्लिक करा व पुढे मयताचे नाव निवडायचा आहे.

नाव निवड ले की संबंधित खातेदारा च्या नावे असलेला गट क्रमांक select करा.

पुढे मृत्यू दिनांक टाका व समाविष्ट करा याला क्लिक करा त्यानंतर निवडलेल्या खातेदारांच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे दिसेल.

अर्जदार हा वारसा पैकी आहे का ??
तुम्ही वारसा पैकी असाल तर होय नसाल तर नाही. यावर क्लिक करा.

आता , वारसांची नावे भरा याला क्लिक करा.

आता ,तुम्हाला वारसदार म्हणून जी नावेलावायची आहेत, त्यांची संपूर्ण माहिती भरा. याच्यामध्ये नाव वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आडनाव ही सर्व माहिती भरा पुढे धर्म निवडायचा आहे. तुम्हाला धर्मानुसार वारसा कायद्याचे नियम पाळले जात असतात .पुढे, इंग्रजीत नाव लिहायचं आहे व जन्मतारीख टाका. त्यानंतर वय आपोआप दिसेल. पुढे, मोबाईल नंबर आणि पिन कोड टाका पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचे नाव आपोआप येईल.

आता तुमचे पोस्ट ऑफिस निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक, गल्लीचे नाव हे सर्व टाका आणि मयताशी असलेले नाते निवडा.

जे तुमचे नाते असेल ते निवडावे लागेल उदाहरणार्थ मुलगा ,मुलगी, विधवा पत्नी ,नातू ,नात सोडून यापैकी कोणतेही नाते नसल्यास शेवटच्या या पर्यायावर क्लिक करावे. वर्ग – 1, वर्ग – 2 वर्ग – 3 आणि वर्ग – 4 मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं आपण निवडून घ्यायचे आहे.

आता सर्व माहिती भरून झाली की ” पाठवा “
त्याच्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला तुमची वारसा संदर्भात भरलेली संपूर्ण माहिती दिसून येईल. समजा तुम्हाला दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचं असेल तर तिथे असलेल्या ” पुढील वारसा ” याला क्लिक करावे लागेल आणि तुम्ही आता जशी संपूर्ण माहिती भरलेली आहे तसेच सर्व माहिती भरून पाठवा याच्यावर क्लिक करावे लागेल.

इथे मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करावी ही ग्रामपंचायत कार्यालयात मिळत असते इतर कागदपत्र ंमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याच्या हेतूने रेशन कार्ड सुद्धा जोडता येईल तसेच मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे आठ चे उतारे तुम्हाला जोडता येतात.

या ठिकाणी एक शपथ पत्र एका कागदावर लिहून जोडणे अपेक्षित असते यात मृत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे तसेच त्यांचा संपूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फाईल अपलोड झाली असा मेसेज दिसतो. Land Inheritance Right

आता तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र दिसेल.

अर्जात भरण्यात आलेली संपूर्ण माहिती योग्य व अचूक आहे त्यामध्ये कोणतीही बाबलपून ठेवण्यात आलेली नाही अथवा चुकीची भरलेली किंवा नमूद केली गेलेली नाही तसे निदर्शनास आल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 177, 193 ,197 ,198, 999 ,200 अन्वे दंडात्मक कारवाई पात्र राहील याची मला संपूर्ण जाणीव आहे म्हणून हे स्वयंघोषणापत्र करीत आहे व तसेच अर्जासोबत सादर केले गेलेली सर्व कागदे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस स्वाक्षरीत केले आहेत.

आता तुम्हाला I Agree याच्यावर क्लिक करा.

त्यानंतर वारसा नोंदणीसाठी तुमचा अर्ज गावातील तलाठी कार्यालयात सबमिट करण्यात येईल त्यानंतर तिथे तुमच्या अर्जाची पाहणी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नाव नोंदणी करण्यात येते.

Leave a comment

error: