Pik Vima Info – 2023 | पिक विमा

पंतप्रधान पिक विम्या मध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या तरतुदी अंतर्गत पिक विमा संरक्षण दिले जाते. या तरतूद पुढील प्रमाणे आहे.

Pik Vima 2023 – : हंगामातील नैसर्गिक परिस्थिती मुळे निर्माण होणारे पिकांचे नुकसान.

  • पावसाचा खंड – : हंगामातील पावसाच्या ऋतुमानानुसार पाऊस नाही पडल्यास किंवा पावसाचा खंड जास्त राहिल्यास पीक जातात त्यामुळे नुकसान भरपाई दिली जाते.
  • पूर – : जर हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे पिकांची नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते.
  • दुष्काळ – : जर पाऊसच पडला नाही तर दुष्काळ निर्माण होतो. जसा की , या हंगामात महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यात एक महिन्यापेक्षा जास्त झालं पाऊसच नाही त्यामुळे तेथे दुष्काळ पडला आहे अशावेळी देखील नुकसान भरपाई दिली जाते.

वरील प्रमाणे पावसाचा खंड ,पूरस्थिती, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई दिली जाते.

शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई किती दिले जाते ?
शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम भरलेल्या एकूण रकमेच्या 25% रक्कम नुकसान भरपाई म्हणून आगाऊ स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

पावसामध्ये सलग 21 दिवस खंड पडल्यास ?

  • महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील प्रमाणे सलग 21 दिवस पाऊस न पडलेली एकूण 300 + महसूल मंडळी आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये पुढील प्रमाणे सलग 15 ते 21 दिवस पावसाचा खंड पडलेली एकूण 328 महसूल मंडळे आहेत.

सलग 21 दिवस पाऊस पडला नसेल तर पीक जाण्याची दाट शक्यता असते कारण पीक वाढीला पौष्टिक वातावरण निर्माण होत नाही.

कृषी आयुक्तालय माहिती देते

सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसात सलग 21 दिवसापेक्षा जास्त कालावधीचा खंड पडला असून त्याचा पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन सरासरी उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट येण्याची परिस्थिती काही ठिकाणी आढळून येत आहे.

कृषिमंत्रलयातर्फे सलग 21 दिवसापेक्षा जास्त पाऊस न झालेल्या मंडळात सर्वेक्षण करण्याचे काम कृषी अधिकारी , विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत.

भरपाई देण्याचे सूत्र खालील प्रमाणे👇👇

उदाहरण – :


– कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम – : प्रति हेक्टर 50 हजार रुपये एवढी आहे.
– पिकाच उंबरठा उत्पादन – : 10 क्विंटल प्रती हेक्टर (अंदाजे) एवढे आहे.
– चालू वार्षिक संरक्षणाद्वारे अपेक्षित उत्पादन – चार क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे.

वरील सूत्राप्रमाणे मांडणी करून घ्या.👇👇👇

10 – 4
———- × 50,000 × 25% = 30000
10

30000 × 25% = 7500 ₹

7500 ₹ प्रति हेक्टर

ज्या भागात मागील पंधरा दिवस ते 21 दिवसापासून पाऊस पडलेला नाही अशा भागात विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्याने जाऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. ज्या भागात पाऊस झाला नाही अशा भागात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उत्पादनातील घट दिसते उत्पादना त झालेली घट याचा अहवाल जिल्हास्तरीय बैठकीत मांडला जातो. पिकांच्या सरासरी उत्पादनात मागील सात वर्षा पेक्षा जास्त घट नोंदवल्या गेल्यास अंदाजे 50% पेक्षा उत्पादनात घट दिसत असेल तर 25% नुकसान भरपाई दिली जाते. याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत होतो. याच्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम विम्याची रक्कम नुकसान भरपाई म्हणून जमा केली जाते.

Pik Vima Info – 2023

सूचना – :

सांगितलेल्या नियमाप्रमाणे मागील 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असेल तर तुमच्या भागात विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे अधिकारी येणे अपेक्षित आहे जर आले नसतील तर तुम्ही स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तुमच्या पिकाच्या स्थितीबद्दल माहिती द्यावी तसेच त्यांना प्रत्यक्ष शेतात भेट देण्यासाठी बोलवावे म्हणजे तुमच्या नुकसानाची नोंद होईल तरी सर्व शेतकरी बंधूंनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच विमा प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

तुम्ही भरलेल्या पिक विमा मध्ये हेल्पलाइन नंबर असतो त्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून विमा प्रतिनिधीला बोलू शकतात.

तालुका कृषी विभाग जिल्हा कृषी विभाग या विभागांशी संपर्क साधून प्रत्यक्षदर्शी झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवावे.

Leave a comment

error: