GR Download In Maharashtra

G R शासन निर्णय असा करा डाऊनलोड

महाराष्ट्र शासनाने घेतलेले निर्णय (G R )कसे पाहतात ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या विविध विभागातील घेतलेले निर्णय म्हणजेच शासन निर्णय( G R ) कसे पाहतात. त्याला डाऊनलोड कसे करतात ते पुढील प्रमाणे

जीआर जर पाहायचा असेल तर एकदम सोपी पद्धत म्हणजे Google याच्यावर फक्त G R असे टाईप करा व सर्च करा.

सर्च केल्यानंतर लगेच पहिलीच वेबसाईट येईल त्या ठिकाणी शासन निर्णय(G R) महाराष्ट्र असे लिहिलेले असेल याला क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल त्यावर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ असे लिहिलेले असेल. या ठिकाणी आल्यानंतर शासन निर्णय कसा पाहायचा कसा डाऊनलोड करायचा ते पहा.

  • विभागाचे नाव – : यामध्ये सर्व विभाग याच्यावर क्लिक करा किंवा ज्या एखाद्या विभागाची माहिती पाहिजे आहे तो विभाग निवडा.
  • महत्त्वाचा शब्द – : याच्यामध्ये एखादा शब्द टाकून जीआर शोधू शकतात.
  • दिनांक पासून दिनांक पासूनची तारीख निवडल्यावर, तीच तारीख दिनांक पर्यंत साठी निवडली जाईल – : याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेपासून ते कोणत्या दिनांकापर्यंत पाहायचा आहे ते निवडू शकता.
  • सांकेतांक क्रमांक – : माहित असेल तर टाका. (यामध्ये कुठलाही क्रमांक नाही टाकला तरी चालतो त्याला तसेच राहू द्या)
  • पडताळणी संकेतांक कोड ( Captcha ) – : याच्यामध्ये आहे तसा कोर्ट टाकून घ्या.

खाली असलेल्या शोधा या ऑप्शनवर क्लिक करा.
आता तो जीआर डाऊनलोड करा.

GR Download In Maharashtra

GR Download In Maharashtra – : त्याच्याखाली आजच्या तारखेला आलेले जीआर दिसतील. त्यामध्ये कोणत्या विभागाचा जीआर आहे. त्याचे नाव, त्याचे शीर्षक ,सांकेतांक क्रमांक, जीआर दिनांक ,आकार( Kb) डाउनलोड याप्रमाणेच सर्व माहिती उपलब्ध होते. या ठिकाणाहून तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेला जीआर दिसत असेल तर डाऊनलोड या ऑप्शन वर क्लिक करून डाऊनलोड करा

Leave a comment

error: