Pradhanmantri Matru Vandana Yojana

Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 राज्यात लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याच्या संदर्भातील जीआर 9 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. ही योजना कशा प्रकारे राज्यामध्ये लागू केली जाणार आहे. त्याची काही उद्दिष्ट, त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे, अटी, शर्ती, पात्रता, त्याच्यासाठी दिले जाणारे अनुदान या सर्वांविषयी सविस्तर माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेऊया.

केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्या निधीमधून राज्यामध्ये 2017 पासून Pradhanmantri Matru Vandana Yojana ही योजना राबवली जात आहे.

जानेवारी 2023 पासून केंद्रशासना च्या माध्यमा तून ” मिशन शक्ती ” हे अभियान राबवले जातआहे. या अभियानाच्या मार्गदर्शन सूचनाच्या अधीन राहून राज्यामध्ये Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 ही योजना राबवण्यासाठी नव आक्टोंबर 2023 रोजी मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या गर्भवती महिलांना अटी ,शर्ती आणि पात्रता यांची पूर्तता केल्यानंतर पहिल्या आपत्यासाठी दोन हप्त्यामध्ये 5 हजार रुपये आणि या पात्र महिलेला दुसऱ्या आपत्तीच्या वेळेस मुलगी झाल्यास मुलीच्या जन्माच्या पहिल्याच टप्प्यामध्ये 6000 रुपये अनुदान दिले जाणार आहे.

त्यासाठी दिल्या जाणाऱ्या अटी ,शर्ती खालील प्रमाणे

 • पहिल्या टप्प्यात लागणाऱ्या अटी – : राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत किमान एक प्रसूती पूर्व तपासणी झालेली असणे आवश्यक आहे.
 • वरील आट पूर्ण करणाऱ्या महिलांना पहिल्या पत्त्यासाठी तीन हजार रुपये अनुदान दिले जाईल.
 • दुसरा हप्ता – : बाळाचे जन्म नोंदणी झाल्यानंतर बालकास बीसीजी ,ओ पी व्ही झिरो, ओपीव्ही तीन मात्रा, पेंटा व्हॅलेंट जशीच्या तीन मात्रा किंवा समतोल्य / पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्यक आहे.
 • वरील अट पूर्ण करणाऱ्या महिलांना पहिल्या पत्त्यासाठी दुसरा हप्ता दोन हजार रुपये दिला जाईल.
 • याच महिलेस दुसरे आपत्य मुलगी असल्यास/ झाल्यास तिच्या जन्मनंतर सहा हजार रुपये अनुदान दिले जाते.( बँकेच्या खात्यात किंवा पोस्ट ऑफिस च्या खात्यात)

उद्दिष्टे

 • माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देण्यास प्रोत्साहित करून त्यांचे आरोग्यास सुधारणा व्हावी.
 • जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधरावे आणि बालक मृत्यू माता मृत्यू दरात घट होऊन नियंत्रण मिळवावे.
 • हा निर्णय जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे स्त्रीभ्रूणहत्या रोखणे स्त्री जन्माचे स्वागत करणे.
 • लाभार्थ्याकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेणे याचे प्रमाण वाढवणे तसेच संस्थात्मक प्रस्तुतीचे प्रमाण वाढवणे.
 • नवजात बालकाच्या जन्माबरोबरच जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र देणे.

अटी

 • लाभ घेणाऱ्या महिलांचे निव्वळ कुटुंबिक उत्पन्न प्रतिवर्षी आठ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील.
 • 40% व अधिक अपंग असणाऱ्या दिव्यांग महिला यासाठी पात्र असतील.
 • bpl , शिधापत्रिका धारक महिला
 • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी
 • मी श्रम कार्ड धारक महिला
 • किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी शेतकरी महिला
 • मनरेगा जॉब कार्ड धारक महिला
 • गर्भवती व स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा कार्यकर्त्या

वरील प्रमाणे दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या महिला पात्र असणार आहेत.

लागणारी कागदपत्रे

 • आधार कार्ड झेरॉक्स किंवा आधार नोंदणी कागदपत्र व त्यासोबत विहित केलेले कागदपत्र
 • , पूर्णपणे भरलेले माता आणि बालक संरक्षण कार्ड यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची नोंद असणे आवश्यक आहे गरोदरपणाची नोंद तारीख प्रस्तुती पूर्व तपासणीच्या नोंदणी असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्याच्या स्वतःच्या बँक पासबुकची झेरॉक्स
 • बाळाच्या जन्म नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स
 • आई आणि बालक संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी ची झेरॉक्स
 • RCH पोर्टल वरील लाभार्थी नोंदणी क्रमांक
 • लाभार्थी महिलेचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक
 • वेळोवेळी सांगितलेले अन्य कागदपत्रे

लाभार्थी महिला कडे आधार नसल्यास

 • बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
 • मतदान ओळखपत्र
 • रेशन कार्ड
 • किसान फोटो पासबुक
 • पासपोर्ट
 • ड्रायव्हिंग लायसन
 • पॅन कार्ड
 • मनरेगा जॉब कार्ड
 • स्वतः महिलेचे किंवा सरकारने तसेच शारीरिक क्षेत्रातील कोणतेही उपक्रमाद्वारे जाहीर केलेले तिच्या पतीचे कर्मचारी फोटो ओळखपत्र.
 • केंद्र सरकार किंवा राज्य सरकार प्रशासनाने जारी केलेले कोणतेही फोटो ओळखपत्र
 • राजपत्रित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या छायाचित्रासह ओळखीचे प्रमाणपत्र अधिकृत केलेले असणे आवश्यक आहे.
 • प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रुग्णालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य कार्ड

Pradhanmantri Matru Vandana Yojana

योजनेचे वैशिष्ट्य व अंमलबजावणी

 • लाभ घेण्यासाठी पहिले आपत्य साठी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून पूर्वी असणाऱ्या 730 दिवसाचा कालावधी कमी करून 510 दिवसांवर आणण्यात आला आहे.
 • जर दुसऱ्या अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मच्या तारखेपासून 210 दिवसापर्यंत संबंधित आरोग्य यंत्रणेकडे हा लाभ दिला जाणार आहे.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वय किमान 18 वर्षे व कमाल 55 या दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • अशा लाभार्थ्याची नोंद पोर्टलवर असणे आवश्यक आहे.
 • एखाद्या लाभार्थी महिलेस तिच्या दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळेस एकापेक्षा जास्त आपत्य जन्मास आले असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 योजनेच्या नियमानुसार मुलगी असल्यास लाभ देण्यात येईल.
 • लाभार्थी महिलेने विहित कालावधीत शासकीय आरोग्य संस्थेत गर्भधारणेची नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • लाभा घेऊन इच्छिणाऱ्या महिलांनी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या http://wcd.nic.in या वेबसाईटवर फॉर्म डाऊनलोड करणे.
 • सिटीजन लॉगिन मधून ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
 • लाभार्थ्यांनी हा फॉर्म पूर्ण भरून स्वाक्षरी करून हमीपत्र सर्व आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा आशा स्वयंसेविका यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
 • Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 योजनेअंतर्गत महिलेच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा केले जातील.
 • लाभार्थ्यांना केवळ आधार कार्डच्या क्रमांकावर लाभ दिला जाईल.

Pradhanmantri Matru Vandana Yojana 2.0 याच्या संदर्भातली सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या साइटवर जाऊन हा जीआर परत एकदा वाचू शकता. धन्यवाद

Leave a comment

error: