Pashu Kisan Credit Card || पशु किसान क्रेडिट कार्ड

केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकरी वर्गासाठी मोहीम राबवली जात आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत पशुपालक मत्स्य पालन करणाऱ्या शेतकरी वर्गाला Pashu Kisan Credit Card दिले जाते.

Pashu Kisan Credit Card हे कार्ड कसे मिळवायचे याचा अर्थ कसा केला जातो. याची सविस्तर माहिती पाहूया

देशासह राज्यांमध्ये मे 2023 पासून Pashu Kisan Credit Card देण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. हे कार्ड मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आव्हान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने केले जात आहे.

अर्जाचा नमुना

कृषी पत कर्जासाठी अर्ज
( पीक कर्ज, केसीसी कृषी ,मुदत कर्ज ,उत्पादन पत)

अर्जदाराचा तपशील

  • याच्यामध्ये संपूर्ण नाव आणि पुरुष असेल वडिलांच्या नावासह संपूर्ण नाव ,जन्मतारीख, वय, लिंग याच्यानंतर आधार कार्ड ,आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक ,वोटर आयडी नंबर ही सविस्तर माहिती अर्जदार तपशील यामध्ये भरायची आहे.

कुटुंबातील सदस्यांचा तपशील

  • Pashu Kisan Credit Card साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कुटुंबातील सदस्यांची नावे, त्यांची वय ,लिंग ,नाते ,व्यवसाय आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अशी सविस्तर माहिती त्या ठिकाणी भरायची आहे.

पत्ता व संपर्क क्रमांक

  • सध्या ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणी घराचा क्रमांक रस्ता क्रमांक गावाचे नाव टपाल कार्यालयाचा पत्ता तालुका व मंडळ जिल्हा पिनकोड इत्यादी सर्व माहिती भरायचे आहे.
  • सध्या राहत असलेला पत्ता व कायमस्वरूपी चा पत्ता एकच असल्यास एकच पत्ता भरावा. आणि मोबाईल नंबर एक शेवटी टाकायचा आहे.

श्रेणी (सामाजिक श्रेणी)

  • सामाजिक श्रेणीमध्ये खुला प्रवर्ग ,एससी ,एसटी, ओबीसी ,शारीरिक अपंगत्व ,अल्पसंख्यांक ,बौद्ध, मुस्लिम ,ख्रिश्चन इत्यादी ते व्यवस्थित त्या ठिकाणी राईट(√) टीक करून घ्यायचे आहे.

विद्यमान बँक/ पत सुविधा

  • याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बचत खाते याची सविस्तर माहिती भरायचे आहे. बँकेचे नाव, खाते नंबर , कर्ज घेतले असेल तर थकबाकी ,मुदत ठेव अशी सविस्तर माहिती याच्यामध्ये भरायची आहे.

अर्जदाराच्या एकूण जमीनदाराचे तपशील

( शेतीत असल्यास, भाडेपट्टी धारक ,निर्दिष्ट करा)

  • Pashu Kisan Credit Card घेण्यासाठी तुमची शेती ज्या गावात आहे. त्या गावचे नाव, त्याचा सर्वे नंबर ,मालकीची, भाड्याची शेती, पिक एकूण क्षेत्र किती, सिंचन व्यवस्था कशी आहे, काही अडचण असल्यास त्याची माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरायचे आहे.

एकूण भूसंपत्ती मालमत्ता पैकी लागू केलेल्या कर्जाशी संबंधित जमीन पीक तपशील

  • तुमच्या असलेल्या एकूण जमिनीपैकी किती क्षेत्रावर कर्ज घेणार आहात. त्याचा तपशील व्यवस्थित या ठिकाणी दिलेल्या रकान्या मध्ये भरायचा आहे. त्याच्यामध्ये परत वरील प्रमाणे सर्व सविस्तर माहिती भरायची आहे. गावाचे नाव ,सर्वे नंबर, घेतले जाणारे पिकाचे नाव खरीप, रब्बी, इतर पिके( फळबागाची माहिती देऊ शकता) सर्वच माहिती व्यवस्थित भरून घ्यायची.

उत्पन्नाचे स्रोत

  • शेतीतून होणार उत्पादन , इतर उत्पन्न यामध्ये काही तुमचा जोडधंदा असेल तर त्याची माहिती किंवा इतर काही उत्पन्न स्रोत आहेत. त्याची माहिती आणि शेवटी एकूण उत्पन्न किती आहे. ते एक द्यायचे आहे.
  • अट – : कमीत कमी पाच हजारापेक्षा जास्त उत्पन्न असणे आवश्यक आहे.

मालमत्तेचा तपशील ( अचल)

  • अचल मालमत्तेमध्ये सध्या तुमच्याकडे किती जमीन आहे. त्याचा सध्याचा बाजार मूल्य किती आहे. पडिक शेती आहे का त्याचा अंदाज मूल्य किती असेल. ट्रॅक्टर ,शेड ,इमारत, घर, ट्रॅक्टर शेड, शेतीतून पीक निघालेले ठेवण्याचे शेड, टाकी मासेमारी तलाव याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे आणि या सर्वांचे सध्याचे बाजार मूल्य अंदाजे द्यायचे आहे. एकूण सर्वांचे बाजारमूल्य हे पण त्या ठिकाणी बेरीज करून लिहायचे आहे.

मालमत्तेचा तपशील ( जंगम)

  • जंगम मालमत्तेमध्ये दुभती जनवारे, पोल्ट्री पक्षी, नांगरणी गुरे ,ट्रॅक्टर, पावर ट्रेलर, इलेक्ट्रिक मोटर, पंप सेट आणि शेतीसाठी आवश्यक असणारे इतर उपकरणे यांचा सविस्तर तपशील त्या ठिकाणी द्यायचे आहे. या सर्व साहित्याचे सध्याचे बाजार मूल्य. या सर्व साहित्याचे एकूण बाजार मूल्य त्या ठिकाणी लिहायचे आहे.( जर तुमच्याकडे याच्या मधील जे साहित्य नाही त्या ठिकाणी काहीच लिहिण्याची आवश्यकता नाही.)

विद्यमानदायित्वाचे तपशील ( कर्ज )

  • यामध्ये तुम्हाला कोणत्या बँकेचे कर्ज देणे बाकी आहे. त्या बँकेचे नाव, त्या संस्थेचे नाव ,कर्ज घेण्याचे कारण, किती पैसे भरायचे बाकी राहिलेत, थकीत कर्ज, काही सुरक्षा देऊ केलेली आहे का? असा सर्वांचा तपशील त्या ठिकाणी लिहायचा आहे. शेवटी एकूण थकबाकी किती द्यायचे तो एक आकडा त्या ठिकाणी लिहायचा आहे.

दायित्वाचा तपशील ( जामीनदार)

  • तुमच्या कर्जाला कोण जामीनदार आहे त्याचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे.
  • तुम्ही कुणाच्याच कर्जाला जामीनदार नाहीत याचा देखील तपशील त्या ठिकाणी द्यायचे आहे.

सुरक्षा प्रस्तावित

  • सुरक्षा प्रस्तावित देऊ केलेल्या प्राथमिक सुरक्षेचा तपशील गरज असेल तर या ठिकाणी द्यायचे आहे.
  • 1 लाख 60 हजार रुपया पर्यंत कुठल्याही प्रकारचे या कर्जामध्ये तारण किंवा सुरक्षा मागितली जात नाही.

जामीनदार हमी

  • जामीनदार हमे असल्यास जामीनदाराचे नाव त्याचे वय राहण्याचा पत्ता संपर्क क्रमांक जामीनदाराचा व्यवसाय येणारा नफा हे सर्व माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे.( याची सुद्धा या ठिकाणी गरज पडत नाही)

घोषणा (पत्र)

  • घोषणापत्र या ठिकाणी अगोदरच व्यवस्थित लिहिलेले असते ते व्यवस्थित वाचून घ्यावे व्यवस्थित वाचल्यानंतर
  • तीन साक्षीदारांच्या सह्या
  • Pashu Kisan Credit Card याच्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची सही किंवा अंगठा
  • तारीख ,ठिकाण

दूध संघाचे पत्रक

  • दूध संघाच्या माध्यमातून एक शिफारस पत्र घ्यायचे आहे.
  • दूध संघाला आजपर्यंत किती दूध दिले आहे. त्याची माहिती या ठिकाणी लिहायचे आहे.
  • सद्यस्थितीत असणाऱ्या जनावरांची संख्या.
  • आज पर्यंत मिळालेले पगार त्याची थोडक्यात माहिती आणि ही पगार कोणत्या बँकेत जमा केली त्या बँकेची माहिती

( अर्ज दूध संघाच्या माध्यमातून सुद्धा दिला जातो. जर तुम्हाला डायरेक्ट बँकेमध्ये द्यायचा असेल तर तुम्ही बँकेमध्ये सुद्धा देऊ शकता.)

सोबत जोडावयाची कागदपत्रे

  • ओळखीचा पुरावा, निवासाचा पुरावा, अर्जदाराचे अलीकडील छायाचित्र(2 पासपोर्ट फोटो) ,जागेची कागदपत्रे (7/12)

ही सर्व माहिती बँकेमध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती बँकेकडून दिली जाईल.( अर्ज दाखल केल्याची पोचपावती आहे)

परिशिष्ट पाच

  • यामध्ये एक घोषणापत्र असते ते व्यवस्थित वाचून भरायचे आहे.
  • त्याच्यामध्ये ओढ कामाची गुरे, दुभती गुरे ,शेळ्या, डुकरे ,कुक्कुटपक्षी इतर काही यांचा तपशील व त्यांची संख्या आणि सध्याचे त्यांचे बाजार मूल्य हे त्या ठिकाणी लिहायचे आहे.
  • सविस्तर माहिती भरल्यानंतर अर्जदाराने खालच्या बाजूला एक सही करायची आहे.

हा अर्ज तुम्ही तुमच्या दूध संघाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष तुम्ही बँकेत देऊ शकता.

Pashu Kisan Credit Card

उद्दिष्ट

  • Pashu Kisan Credit Card देण्याचे 25 लाख एवढे उद्दिष्ट आहे तरी आपल्या दूध संघाच्या माध्यमातून किंवा स्वतः प्रत्यक्ष बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत. धन्यवाद

Leave a comment

error: