pik vima claim 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाचा खंड पडलेला आहे. जवळजवळ दुष्काळजन्य परिस्थिती किंवा दुष्काळच पडला आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. काही शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे करपून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.

अशा निर्माण झालेल्या परिस्थितीत आपल्या झालेल्या नुकसानीचा क्लेम करायचा असेल. तर तो कसा करायचा याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.👇👇

असा करा पिक विमा क्लेम – :

pik vima claim 2023 – : सुरुवातीला playstore मधून Pmfby (crop Insurance) हे ॲप्लीकेशन फोन मध्ये इन्स्टॉल(Install)करा.

Open

त्याला Open करा यामध्ये
– Login for Policies
– Continue Without Login
या दोन्ही मधून क्लेम करू शकता. ( जर तुमच्याकडे फक्त पॉलिसी नंबर असेल तरी पण तुम्ही क्रॉप संदर्भात इंटीमेशन देऊ शकता. किंवा याच्या अगोदर तुम्ही पॉलिसीसाठी युजर आयडी बनवला असेल तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ,पासवर्ड टाकून ,इंटर कॅपच्या कोड टाकून ,लॉगिन करू शकता.)

Continue Without Login याच्यावर क्लिक करा.

Hello, Guest Farmer याच्यामध्ये Crop Loss याला क्लिक करा.

पुढे, Crop Loss Intimation याच्यावर क्लिक करा.

Mobile Number Verification

पुढील पेजवर Mobile Number टाका. Send otp याच्यावर क्लिक करा. मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकून घ्या. हे केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय होईल.

Please Select scheme – :

पुढील पेज मध्ये

 • Season –> Kharif (यामध्ये तुमचा हंगाम निवडायचा आहे. )
 • Year –> 2023 ( याच्यामध्ये वर्ष निवडायचे आहे.)
 • Scheme –> Pradhan Mantri Fasal Bima Yojana ( स्कीम याच्या मध्ये योजनेचे नाव निवडायचे आहे.)
 • State –> Maharashtra ( याच्यामध्ये आपले राज्य निवडायचे आहे.)

वरील सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर SELECT याच्यावर क्लिक करा.

Application Source – :

पुढील पेजवर Application Source

 • तुम्ही पॉलिसी कुठे काढलेली आहे ते निवडायचे आहे. 1) bank 2) csc 3) Farmer Online 4) Intermediary जिथून काढले आहे ते निवडा.
  आणि Do you Have Application/ Policy Number ? पॉलिसी नंबर नसेल तर तुमच्या राज्याचे नाव ,तुमच्या जिल्ह्याचे नाव ,तालुक्याचे नाव ,तुमचे सर्कल, ग्रामपंचायत, विलेज, क्रॉप नेम, सर्वे नंबर अशी बरीच सारी माहिती त्या ठिकाणी दिसेल ती सर्व माहिती भरा. जर तुमच्याकडे पॉलिसी नंबर असेल तर खालील प्रमाणे भरा.

पुढे, Enter Application/ Policy Number पॉलिसी नंबर असेल तर टाका. DONE याच्यावर क्लिक करा.

Policy Details -:

पुढील पेजवर, Policy Details pik vima claim 2023

याच्यामध्ये तुमच्या पॉलिसीची सर्व माहिती दिसेल त्यामध्ये तुमचे नाव, गाव ,जिल्हा याच्यामध्ये Select Application From The List याच्या खाली असलेल्या चौकोनी डब्यावर(✔️) क्लिक करा.

Report Incidence – :

या पेज मध्ये कशामुळे पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडायचे आहे. (या पेजवर परिचय ऑप्शन तुम्हाला दिसतील जसं की ढगफुटी जास्त पाऊस किडीचे नुकसान बरेचसे नुकसानी संदर्भातील नावे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील.)

 • परंतु आपण या ठिकाणी Drought याला सिलेक्ट करा.
 • Date of incidence याच्यामध्ये पावसाचा खंड असल्याने कोणतीही एक तारीख टाका चार ते पाच दिवसा मधली अंदाजे. (28/08/2023)
 • Status of Crop At The Time Of Incidence (याच्यामध्ये पिकाची परिस्थिती जी असेल ते निवडा पीक उभे आहेत किंवा काढणीला आले आहेत.) Standing Crop
 • Expected Loss In Percentage अंदाजे पिकांचे नुकसान किती टक्के झाले आहे ते टाका. 70%
 • Remarks याच्यामध्ये पावसाचा खंड पडला आहे याच्यामुळे नुकसान झाले आहे. किंवा मागील 15 ते 30 दिवसापासून पाऊस नाही म्हणून पिकाचे नुकसान झाले आहे असेही टाकू शकता.
 • Upload Photo याच्यामध्ये पिकाचे नुकसान झालेल्या चा फोटो टाका.
 • Upload Video याच्यामध्ये नुकसान झालेल्या पिकाचा व्हिडिओ टाका.
 • Name of Farmer याच्यामध्ये शेतकऱ्याचे नाव दाखवले आहे आधार नंबर दाखवलेला आहे त्याच्याच खाली Submit त्याच्यावर क्लिक करा.

pik vima claim 2023

आता तुमच्यासमोर एक डॉकिट नंबर इन या डोकेट नंबर वन तुम्ही केलेल्या क्लेमची माहिती जाणू शकता.

सर्व शेतकरी बंधूंनी वरील दिलेल्या माहितीप्रमाणे पिक विमा क्लेम करून घ्यावा जर तुम्हाला येत नसेल तर दुसऱ्या कुणाकडून करावा परंतु पिक विमा क्लेम करायचे विसरू नका धन्यवाद.

Leave a comment

error: