Input Subsidy 2023 | निविष्ठा अनुदान | Input Grant Approved

राज्यातील एप्रिल व मे 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी आज रोजी दिनांक 12 सप्टेंबर 2023 आला शासन निर्णय

राज्यातील अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान एप्रिल व मे 2023 मध्ये झाले होते. अशा शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाते हे अनुदान राज्यातील चार जिल्ह्यांना मंजूर झाले आहे त्या जिल्ह्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहू

मार्च व एप्रिल 2023 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानी करिता वितरित करावयाच्या मदतीचा निधी खालील प्रमाणे आहे.

अमरावती

Input Subsidy 2023 – : अमरावती या जिल्ह्यातील मे 2023 या महिन्यात नुकसान झालेल्या एकूण 6620 शेतकऱ्यांसाठी रुपये 1209.57( बारा कोटी नऊ लाख रुपये) एवढा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील शेती पिकांची शेती पिकांचे 5472.91 हेक्टर आहे.

यवतमाळ

Input Subsidy 2023 – : यवतमाळ या जिल्ह्यातील मे 2023 या महिन्यातील नुकसान झालेल्या एकूण 7603 शेतकऱ्यांसाठी रुपये 812.63 (आठ कोटी बारा लाख) एवढा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेती पिकांचे बाधित क्षेत्र 4760.70 हेक्टर आहे.

बुलढाणा

Input Subsidy 2023 – : बुलढाणा या जिल्ह्यातील मे 2023 या महिन्यातील नुकसान झालेल्या एकूण 11 शेतकऱ्यांसाठी रुपये 0.74 ( 74 हजार रुपये) एवढा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेती पिकांचे बाधित क्षेत्र 4.35 हेक्टर एवढे आहे.

वाशिम

Input Subsidy 2023 – : वाशिम या जिल्ह्यातील मे 2023 या महिन्यातील नुकसान झालेल्या एकूण 206 शेतकऱ्यांसाठी रुपये 14.64 ( 14 लाख 64 हजार रुपये) एवढा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील शेती पिकांचे बाधित क्षेत्र 81.69 हेक्टर एवढे आहे.

बुलढाणा

Input Subsidy 2023 – : बुलढाणा या जिल्ह्यातील एप्रिल 2023 या महिन्यातील नुकसान झालेल्या एकूण 2391 शेतकऱ्यांसाठी रुपये 248.85 ( दोन कोटी 48 लाख 85 हजार रुपये) एवढा निधी राज्य शासन कडून मंजूर करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेती पिकांचे बाधित क्षेत्र 1477.69 हेक्टर एवढे आहे.

Input Subsidy 2023 | निविष्ठा अनुदान

एप्रिल व मे 2023 या कालावधीतील राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासनाच्या वतीने रुपये 2286.43 लक्ष ( 22 कोटी 80 लक्ष 43 हजार रुपये) इतका निधी वरील चार जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे.

अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे व झालेल्या शेतीचे नुकसान देण्यासाठी राज्य शासनाकडून हा निधी निविष्ठा अनुदान (Input Subsidy ) म्हणून दिला जातो.

Leave a comment

error: