खताला 100% अनुदान | स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर

स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अंतर्गत शेतकऱ्यांना खतासाठी 100% अनुदान देण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडयोजना ही योजना 6 जुलै 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे. 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते. याच्यामध्ये 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलम लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत दिल्या जाणारे 100% अनुदान तसेच आता रासायनिक खते राज्य सरकारच्या वतीने 100%अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी ” राज्य सरकारने 100 कोटीची तरतूद ” केलेली आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडयोजना

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान ” कृषी मंत्री धनंजय मुंडे ” यांनी केले आहे.

Leave a comment

error: