खरीप हंगाम 2023 | Kharif season 2023 | Agrim Pikvima

Kharif season 2023 मध्ये शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25% पीक विमा मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. Kharif season 2023 संदर्भातील जीआर 5 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

Kharif season 2023 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबवली जात आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती पिकाची एक रुपयांमध्ये पिक विमा उतरवलेला आहे. या शासनाच्या सर्व समावेशक धोरणामुळे राज्यभरातील एक कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा पॉलिसी काढलेल्या आहेत.

Kharif season 2023 मध्ये पावसाचा खंड तसेच काही भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस होणे अशा नैसर्गिक विविध कारणामुळे शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या नुकसान भरपाई साठी बऱ्याचशा जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढलेल्या आहेत.

अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात क्लेम देखील केलेले आहेत. तसेच सोयाबीन पडलेला येल्लो मोजक या रोगामुळे देखील सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचे देखील मोठ्या प्रमाणात क्लेम करण्यात आलेले आहेत.

राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानाचा हप्ता म्हणून 1265 कोटी 75 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

26 जून 2023 च्या पिक विमा योजनेच्या जीआर नुसार अतिवृष्टी पावसाचा खंड गारपीट तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आगरीन पिक विमा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी अनुदानाचा हिस्सा पूर्णपणे वितरित करणं आवश्यक आहे. हा निधी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या अगोदर साडेपाचशे कोटी रुपयाचा निधी पिक विमा कंपन्याला देण्यात आलेला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हिश्याची अनुदानाची रक्कम पिक विमा कंपन्यांना मिळाल्यानंतरच आगरीन पीक विम्याचे वाटप केले जाते. अनिल देण्यासाठीच 5 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य शासनाकडून एक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

या जीआर मध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानापोटी पीक विमा कंपन्यांना 628 कोटी 43 लाख 43 हजार 542 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे.

  • भारतीय कृषी विमा कंपनी
  • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • एचडीएफसी इरगो लिमिटेड
  • युनिव्हर्सल सोंम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • चोला मंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
  • युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

या नऊ कंपनीच्या माध्यमातून राज्यांमध्ये विमा योजना राबवली जाते.

Kharif season 2023

4 ऑक्टोबर 2023 च्या बैठकीमध्ये वरील सर्व कंपन्यांनी ज्या निधीची मागणी केली होती तो निधी आता देण्यात आलेला आहे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचश्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिसूचना काढून जवळजवळ महिना होत आलेला आहे कुठे महिना झालेला देखील असेल याचा अर्थ असा की आग्रीम पिक विमा हा अधिसूचना काढल्यापासून एक महिन्याच्या हात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे आवश्यक असते.

आज पर्यंत कंपन्या म्हणत होत्या आमचा उर्वरित निधी राज्य शासनाने दिलेला नाही. शेतकरी हप्त्यापोटीचा उर्वरित निधी आता राज्य शासनाने दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 25% आग्रीम पिक विमा बँक खात्यामध्ये जमा होईल।

Leave a comment

error: