E Pik Pahani info 2023

ई पीक पाहणे म्हणजे शासन दरबारी ऑनलाईन स्वतः पिकाची नोंद करणे. शेतकरी स्वतःच्या तसेच मित्रांच्या शेतातील विविध हंगामातील खरीप, रब्बी, उन्हाळी या तीन हंगामामध्ये पिकांची नोंद करता येतात. तसेच विहीर ,फळबागा अशा विविध प्रकारच्या नोंदी शेतकरी करत आहेत.

शेतकरी स्तरावरील व तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदणी केली जाते.

बऱ्याचशा शेतकरी वर्गाला ई पीक पाहणे कालावधी माहित नसतो. याची सविस्तर माहिती आपण पाहूया.

खरीप हंगाम

  • खरीप हंगामातील ई पीक पाहणीचा कालावधी 15 जून ते 15 ऑक्टोंबर पर्यंत असतो. हा कालावधी शेतकऱ्या ंसाठी असतो.
  • खरीप हंगामातील ई पिक पाहण्याच्या कालावधी 16 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर हा कालावधी तलाठी यांच्यासाठी असतो. या कालावधीत तलाठ्याच्या वतीने शेतकऱ्यांनी केलेल्या ई पिक पाहणीची तपासणी केली जाते.
  • रब्बी हंगाम
  • रब्बी हंगामातील एक पाहणी 16 ऑक्टोबर ते 15 फेब्रुवारी या कालावधीत करतात.
  • रब्बी हंगामात देखील 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत शेतकऱ्याने केलेल्या ई पिक पाहण्याची तपासणी तलाठी कार्यालयाच्या वतीने केली जाते.
  • उन्हाळी हंगाम
  • उन्हाळी हंगामातील ई पिक पाहणी 16 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान केली जाते.
  • उन्हाळी हंगामातील शेतकऱ्याने केलेली ईपीक पाहणी ची तपासणी तलाठी कार्यालयाच्या वतीने 1 मे ते 31 मे या कालावधीत केली जाते.

वरील खरीप, रब्बी, उन्हाळी या तिन्ही कालावधीतील केलेल्या ई पीक पाहणी मध्ये जर बदल करायचा असेल तर 48 तासाचा कालावधी असतो याची सर्वांनी नोंद घ्यावी.

ई पीक पाहणी करताना काही चुका झाल्या व तुम्हाला देण्यात आलेला 48 तासाचा कालावधी उलटून गेला असेल तर त्या चुका तुम्ही तलाठ्याकडून तसेच मंडळ अधिकाऱ्याकडून दुरुस्त करू शकतात.

E Pik Pahani info 2023

E Pik Pahani info 2023 – : केंद्र सरकारच्या वतीने ई पीक पाहणी करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सोप्या पद्धतीने ई पिक पाहणी करण्यात यावी या उद्देशाने नवीन एप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे.

सध्या हे एप्लीकेशन काही भागात प्रायोगिक तत्त्वावर वापरले जात आहे. लवकरच सर्व शेतकरी वर्गांना हे ॲप्लिकेशन उपलब्ध होईल.

या ई पीक पाहणी एप्लीकेशनचे नाव Digital Crop Survey Application हे आहे.

वरील ई पीक पाहणी संदर्भातील सर्व माहिती व्यवस्थित वाचून शेतात असलेल्या पिकांची नोंद सर्व शेतकऱ्यांनी करावी धन्यवाद

Leave a comment

error: