Beed 2023 | पिक विमा नुकसान भरपाई

महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये मागील 21 दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून पावसाचा खंड आहे त्यामुळे पिक करपले आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

खरीप हंगाम हातातून जवळपास गेलेला आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे.

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यामधील जवळजवळ सर्वच महसूल मंडळामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे.( पिके करपलेली आहेत ) या सर्व पार्श्वभूमीवर सरसकट पिक विमा दिला जावा अशी मागणी सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे. सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम 25% पिक विमा देण्यात यावा.

वरील सर्व झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 87 महसूल मंडळाकरिता 25% अग्रीम पिक विमा देण्याची अधिसूचना देण्यात आली आहे.

Beed 2023 | पिक विमा नुकसान भरपाई – : प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण झालेले नुकसान या झोपमीच्या आधारावर नुकसान भरपाई निश्चित करण्याबाबत.

अहवालानुसार प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पुढे नमूद केलेल्या सोयाबीन ,मूग ,उडीद या अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई 25% रक्कम देण्यात यावी. असे बीड जिल्हा अधिकारी यांनी आदेशित केले आहे.

मूग पिकासाठी 22 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
उडीद पिकासाठी 12 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तर सोयाबीन साठी उर्वरित सर्व महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

मुगासाठी असलेले महसूल मंडळे पुढील प्रमाणे – :

  • शिरूर तालुक्यामधील – : तिंतरवणी
  • गेवराई तालुक्यातील – : गेवराई ,धोंडराई ,चकलंबा ,मादळमोही, जातेगाव, तलवाडा , रेवकी, शिरसदेवी ,कोळगाव ,माटेगाव इत्यादी
  • केज तालुक्यातील – : केज ,हनुमंत पिंपरी, चिंचोली माळी ,मसाजोग इत्यादी
  • धारूर तालुक्यातील – : मोहखेड ,तेलगाव इत्यादी
  • पाटोदा तालुक्यातील – : पाटोदा, थेरला, अमळनेर ,कुसळंब इत्यादी
    वरील एकूण 22 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उडीद पिकासाठी निवडण्यात आलेले महसूल मंडळ पुढील प्रमाणे – :

  • आष्टी तालुक्यातील – : आष्टी, कडा ,धामणगाव, पिंपळा ,टाकळसिंगे ,धानोरा ,दादेगाव, डोईठाण ,आष्टा ह. ना. इत्यादी
  • पाटोदा तालुक्यातील – : पाटोदा ,थेरला, अमळनेर, कुसळम इत्यादी
    वरील 12 महसूल मंडळांचा समावेश उडीद पिकासाठी करण्यात आलेला आहे.

सोयाबीन पिकासाठी निवडण्यात आले ले महसूल मंडळे पुढीलप्रमाणे – :

  • बीड तालुक्यातील – : बीड ,मांजरसुंबा ,चौसाळा, पेंडगाव ,नेकनूर , पिंपळनेर ,राजुरी नवगण, लिंबागणेश, कुर्ला, घाटसावळी ,पारगाव सिरस, चरहाटा ,येळंब घाट इत्यादी
  • आष्टी तालुक्यातील – : आष्टी ,कडा, धामणगाव, पिंपळा ,टाकळसिंग ,धानोरा, दादेगाव ,डोईठाण, आष्टा ह.ना.इत्यादी
  • शिरूर कासार तालुक्यातील – : तिंतरवणी
  • माजलगाव तालुक्यातील – : माजलगाव, गंगामसला, दिंद्रुड ,नित्रुड, तालखेड , किटी आडगाव , मंजरथ इत्यादी
  • गेवराई तालुक्यातील – :गेवराई ,उमापूर, चकलांबा, मादळमोही ,जातेगाव, तलवाडा, रेवकी, शिरसदेवी, कोळगाव माटेगाव इत्यादी
  • वडवणी तालुक्यातील -: वडवणी ,कवडगाव बुद्रुक
  • अंबाजोगाई तालुक्यातील – : अंबाजोगाई ,लोखंडी ,सावरगाव ,बार्दापूर ,ममदापूर, राडी इत्यादी
  • परळी तालुक्यातील – : शिरसाळा ,नागपूर , धर्मापुरी ,पिंपळगाव गाडे ,मोहा इत्यादी

वरील सर्व महसूल मंडळांची सोयाबीन पिकासाठी निवड करण्यात आलेली आहे.

Beed 2023 | पिक विमा नुकसान भरपाई

वरील सर्व महसूल मंडळा तील बाधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ स्वरूपात जमा करण्यात येईल.

भारतीय कृषी विमा कंपनी यांना अधिसूचित करण्यात आलेली पिके सोयाबीन मूक व उडीद यांच्यासाठी 25% नुकसान भरपाई जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Leave a comment

error: