ई पीक पाहणी केली का ? | e-pik pahani keli ka 2023

ई पिक पाहणे झाली आहे का तसेच गावातील किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली आहे ? किती क्षेत्राची ई पीक पाहणी झाली आहे. याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो ई पिक पाहणी केलेली असेल तर शासन दरबारी तुमच्या पिकाची तसेच शेताच्या नोंदी अद्यावत असल्या मुळे शासनाला अनुदान किंवा नुकसान भरपाई देण्यासंदर्भात माहिती उपलब्ध होते. त्यामुळे सर्वांनी ई पिक पाहणी करून घ्यावी.

ई पीक पाहणी झाली का नाही ते असे तपासा ?

e-pik pahani keli ka – : Mahabhumi.maharashtra.gov.in या साईटला सर्च करा. आता तुमच्यासमोर भूमी अभिलेख चे पेज ओपन होईल.

सेवा – : याच्यामध्ये ई-पिक पाहणी याच्यावर क्लिक करा. पुढील पेज ओपन होईल.

हंगाम निवडा, महसूल विभाग निवडा ,जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा ,याच्या खाली ” पिक पाहणी अहवाल “याच्यावर क्लिक करा. पुढील पेजवर

शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती दिसेल खातेदाराचे नाव, खाते क्रमांक ,गट क्रमांक ,ई पीक पाहणी दिनांक ,पिकाचे नाव, पिकाचा प्रकार, पेरणी क्षेत्र,
तुम्ही केलेली ई पिक पाहणी 48 तासाच्या आत दुरुस्त करू शकतात.

काही शेतकऱ्यांच्या नोंदी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून केल्या जातात. ज्यांची नोंद तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून झाली आहे. अशा शेतकऱ्यांची माहिती या पोर्टलवर लगेच उपलब्ध होत नाही कमीत कमी 48 घंटे पेक्षा जास्त कालावधी लागतो.

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी झाली नसेल तर 15 सप्टेंबर पर्यंत तुमची ई पिक पाहणी करून घ्या.

अशाच नवीन अपडेट साठी आमच्या साईटला भेट देत रहा धन्यवाद.

e-pik pahani keli ka

www.bhagirathigold.com

Leave a comment

error: