कृषी सेवा केंद्राचा परवाना

कृषी सेवा केंद्र चा परवाना असा मिळवायचा ? अर्ज कसा करायचा ? त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

अनेक तरुण मित्र कृषी विषयातील पदवी घेऊन कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवून व्यवसाय करण्याचा विचार करतात. तसेच व्यवसायाचे साधन म्हणून कृषी सेवा केंद्राला पाहतात.

कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खते ,बियाणे तसेच कीटकनाशकांची विक्री करता येते. हे सर्व करण्यासाठी कृषी विभागाकडून त्याच्यासाठी रीतसर परवाना असणे आवश्यक आहे. हा रीतसर परवाना घेण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते. तसेच , कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द होऊ शकतो ?

कृषी सेवा केंद्राचा परवाना

👉 #कृषी सेवा केंद्राचा परवाना अर्ज#

1) कृषी सेवा केंद्राच्या परवाना मिळवण्यासाठी कृषी विषयात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

2) आपले सरकार या पोर्टलवर अर्ज करा. (नोंदणी करा)

3) कृषी विभाग या पर्याया वर क्लिक करून कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळण्यासाठी अर्ज करू शकतात.

👉 #कृषी सेवा केंद्राच्या परवाना मिळण्यासाठी किती खर्च लागतो#

1) कीटकनाशक परवाना पाहिजे असेल = ₹ 7500 /- फीस लागते

2) बियाणे विक्रीचा परवाना पाहिजे असेल = ₹ 1000 /- फेस लागते

3) रासायनिक खत विक्रीचा परवाना पाहिजे असेल = ₹ 450 /-

👉 #कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्र#

1) ज्या ठिकाणी तुम्हाला दुकान टाकायचे आहे त्या जागेचा गाव नमुना आठ

2) ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र

3) जागा भाडे तत्वाने असेल तर भाडे पट्ट्याचा करार

4) दुकान टाकणाऱ्यांचे आधार कार्ड ,पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो

5) शैक्षणिक कागदपत्रे / प्रमाणपत्र

👉#अर्ज केल्या नंतर पुढची प्रक्रिया#

कृषी सेवा केंद्राचा परवाना – : तुम्ही अर्ज केल्यानंतर जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी यांच्या कडे तुमचा अर्ज जातो. त्यांनी अर्जावर मंजुरी दिल्यानंतर कृषी उपसंचालक यांच्याकडे अर्ज जातो. त्याच्या नंतर कृषी उपसंचालकाने मंजुरी दिली की अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जातो. यांनी तुमचा अर्ज मंजूर केला की तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळते.

ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी जवळपास एक महिना कालावधी लागू शकतो

👉#कृषी केंद्राचा परवाना रद्द केव्हा होतो#

1) दर पाच वर्षांनी नूतनीकरण नाही केल्यास रद्द होतो.

2) कृषी केंद्रावर बेकायदेशीर रीतीने खते ,बियाणे कीटक नाशकांचे विक्री करत असाल तर रद्द होतो.

👉#कृषी सेवा केंद्रातून किती कमाई (फायदा) होतो#

1) कीटकनाशक विक्रीतून 7% ते 14% इतका नफा राहतो.

2) खतांच्या विक्रीतून 4% ते 8% नफा राहतो.

3) बियांच्या विक्री मधून 9% ते 11% नफा राहतो.

वरील सर्व नफ्याची माहिती एका कृषी सेवा केंद्र चालकाच्या माहितीने देण्यात येत आहे.

Leave a comment

error: