C S C कमिशन 2023

सीएससी चालकांनी पिक विमा भरला, एक रुपयांमध्ये, पण कमिशनचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

-अभिनंदन-

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली त्याबद्दल प्रथमतः राज्य सरकारचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

महाराष्ट्र सरकारने सीएससी सेंटर धारकांना एक रुपयात पिक विमा भरा व सांगितलेल्या नियमांची अंमलबजावणी करा असे सांगितले त्याप्रमाणे सर्व सीएससी सेंटर धारकांनी पिक विमा भरले परंतु सर्व सीएससी धारकांनी पिक विमा भरल्यानंतर पण त्यांना अद्याप पर्यंत ₹ 40 कमिशन मिळालेले नाही. याचा जबर फटका सर्व सीएससी सेंटर चालकांना बसला आहे.

– G R –

विमा भरून आता जवळजवळ एक महिना कालावधी उलटून गेला आहे तरीदेखील शासनाने जारी केलेल्या GR नुसार 40 ₹ कमिशन सीएससी सेंटर धारकांना मिळाले नाही. सर्व सीएससी सेंटर चालकांना शासनाने व सीएससी कंपनीने एक दमडाही दिला नसल्याने सीएससी सेंटर चालकांना चिंतेत टाकले आहे.

– आदेश –

C S C कमिशन 2023 – : महाराष्ट्र शासनातील कृषी खात्याच्या वतीने एक रुपयाही शेतकऱ्याकडून घेऊ नये असे आदेश दिले होते. ते सर्व आदेश सीएससी सेंटर चालकांनी तंतोतंत मानून पिक विमा भरले.

काही सी एस सी सेंटर धारकाकडून भरलेल्या पिक विम्याचे कमिशन लवकरात लवकर आमच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

तरी सर्व सीएससी चालकांनी ही बातमी महाराष्ट्र शासनाच्या सर्व मंत्र्यांच्या मोबाईल मध्ये पोहोचेल तोवर Share करावी.

C S C कमिशन 2023

अशी मागणी, CSC चालक संघटनेचे श्री रवींद्र घाडगे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a comment

error: