सोयाबीन

सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची समस्या आणि शास्त्रीय कारण व उपाय याचीच आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.

सोयाबीन

–> सोयाबीनची पाने पिवळी का पडत आहेत ?
प्रामुख्याने सोयाबीनवर पडलेला पिवळा मोझक रोग आल्यामुळे पाने पिवळे होऊ शकतात. किंवा करपा रोग देखील आला तर सोयाबीनचे पाने पिवळी होण्याची शक्यता आहे.

–> शास्त्रीय कारण ?
सोयाबीन पिकाचे पाने पिवळे पडण्याची समस्या ही बऱ्याचशा शेतकरी मित्रांना येत आहे. त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात पाऊस झाला किंवा कमी प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे सोयाबीनला अन्न व्यवस्थित शोषण करून घेता येत नसल्यामुळे नत्राची , फेरस सल्फेट याची कमतरता दिसून येत आहे.

विषाणूजन्य रोग तो म्हणजे पांढऱ्या माशा पानावर बसतात त्याच्यामुळे होतो. त्याच्यामुळे देखील सोयाबीनचे पाने पिवळे होतात.

अशी काय कमतरता आणि रोग पडल्यास झाडाची वाढ खुंटते त्याच्यामुळे शेंगा या कमी लागतात आणि शेतकऱ्याला उत्पादन कमी निघते.

—> शास्त्रीय उपाय ?
ज्या ठिकाणी सोयाबीन पिवळी पडली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी मारणे खूप गरजेचे आहे. ज्या ठिकाणी जास्त पाणी जमा आहे ते पाणी शेतातून काढणे आवश्यक आहे. शेतात वापसा होताच 19-19-19 100 ग्रॅम आणि याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएंट किंवा ग्रेट टू हे 50 ग्रॅम ग्रेटेड फेरस सल्फेट याची जर तुम्ही सोयाबीन वर फवारणी केली तर जो काही अन्नद्रव्यांमुळे पिवळेपणा आलेला आहे तो आपण कमी करू शकतो.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी
निंबोळी अर्क 5% किंवा आधार ग्राफ्टिंग 1500 ppm प्रति 20 लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करू शकतो. जर पांढरी माशांचे प्रमाण जास्त असेल तर डायमोटेक ,लॅमडा थ्री प्लस याची जर आपण फवारणी केली तर पांढऱ्या माशी मुळे जी काही पाने सोयाबीनची पिवळी पडत आहेत त्याच्यावर आपण नियंत्रण मिळू शकतो.अधिक माहितीसाठी जवळील कृषी सेवा केंद्राला भेट द्या धन्यवाद

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Leave a comment

error: