Pension

प्रत्येक माणसाला वाटते चांगली सरकारी नोकरी मिळावी. त्याच्यामुळे समाजात आपल्याला मानसन्मान मिळतो. तसेच, स्वतःच्या फॅमिलीला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते .आणि रिटायर झाल्यानंतर पेन्शन देखील मिळते..

पण, आता काही अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार की नाही याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pension- : ए एस , आयपीएस अशा बड्या अधिकाऱ्यांना त्यांच्या केडरनुसार विविध राज्यांमध्ये नियुक्त्या दिल्या जातात.

–> गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्यास काय होते ??
अशा अधिकाऱ्यांवर केंद्र सरकार बदललेल्या निर्णयानुसार डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकतं कारवाही करू शकते.

All india Services Rule 1958 (Death cum Retirement rule) या ॲक्ट मध्ये केंद्र सरकारने आता बदल केला आहे. केलेल्या बदलामुळे केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यावर तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर थेट कारवाई करून त्यांची pension रोखू शकते.

–> कोणत्या गुन्ह्यात कारवाई होणार / होऊ शकते ??
संवेदनशील सरकारी माहितीसाठी असणाऱ्या ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 1932 याच्यातील गुन्ह्यांचा समावेश असेल. तसेच इतर गुन्हे असू शकतात.
भारताचा जनहित तसेच सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण होणाऱ्या गंभीर गुन्ह्यात देखील कारवाई होते.
ए डी ,सी बी आय अशा विविध गुप्तचर खात्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांवर जास्त जबाबदारी असते. हे अधिकारी कुठल्याही प्रकारचे माहिती कोणत्याही माध्यमातून प्रकाशित करू शकत नाहीत.

–>निवृत्त अधिकाऱ्यांच्या हक्कावर गदा आली का ??
बरेचसे निवृत्त अधिकारी सरकारवर तोंडसुख घेत असतात. अशा अधिकाऱ्यांची तोंडे कायमची बंद होतील. या नियमांचा निवृत्त अधिकाऱ्यांच्या वतीने एकच म्हणणं आहे रिटायर झाला तोंड बंद ठेव.

निवृत्त अधिकाऱ्यांच्या मते pension धारकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारने या कायद्यात बदल केला आहे. त्यामुळे, आता लेख लिहिणे असो , मुलाखती देणे ,आंदोलन ,चर्चासत्रात भाग घेणे .अशा सर्व बाबींवर आता बंदी आली आहे.

सर्व निवृत्त अधिकाऱ्यांच्या मते आमच्या मूलभूत अधिकारावर गदा आली आहे. असे मत व्यक्त होत आहे.

याच्यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांच्या मते बदल केलेल्या नियमाचा सार म्हणजे आता केंद्र सरकारला सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत तसेच ते त्यांच्या निर्णयाच्या विरोधात बोलणाऱ्या अधिकाऱ्यांचे pension कुठल्याही क्षणी बंद करू शकतात. हा विषय केंद्र सरकारच्या मर्जीचा झाला आहे.

Leave a comment

error: