मृदू व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य

मृदू व जलसंधारण विभागाअंतर्गत 670 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले 670 रिक्त पदांचे सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत राज्यस्तर ,जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) ,गट – ब (अराजपत्रित) या संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत.

शासन अधिसूचना, दिनांक 21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियमित अधिसूचित करण्यात आलेले आहेत त्यानुसार आयुक्त ,मृदू व जलसंधारण औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्रभारी असतील. या अनुषंगाने आयुक्त मृदू व जलसंधारण औरंगाबादविभाग यांच्या अध्यक्षतेखाली राज्यनिवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरती साठी “टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस” या कंपनीसोबत करारनामा करण्यात आला आहे.

या परीक्षेसाठी अभ्यासक्रम तात्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करण्यात येत आहे त्यानुसार पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदवी कास्तर) मराठी, सामान्य ज्ञान, इंग्रजी ,बुद्धिमापन चाचणी या विषयाचा समावेश असणार आहे.

मृदू व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य

ही सर्व भरती प्रक्रियाTCS/IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. अशी माहिती मंत्री संजय राठोड मृदू व जलसंधारण विभाग यांनी दिली आहे.

Leave a comment

error: