Innovative Plans – 2023 | नाविन्यपूर्ण योजना

Innovative Plans – 2023 – : राज्यातील दूध उत्पादनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना चालवली जाते. या योजनेद्वारे दूध उत्पादन वाढावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच योजनेची आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत. याचा शासन निर्णय 11 सप्टेंबर 2023 रोजी आला आहे.

Innovative Plans – 2023 – : राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 02दुधाळ देशी गाई तसेच 02 संकरित गाई व 02 म्हशी एक गट वाटप करणे या योजनेच्या निवड निकषांमध्ये दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी व अल्पभूधारक शेतकरी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचा दिनांक 27 /4 /2023 चा शासन निर्णय मध्ये जे लाभार्थी निवडीचे निकष ठरवण्यात आले होते. या नावीन्यपूर्ण योजनेच्या निवडीमध्ये बदल करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात यावी.

  • दारिद्र रेषेखालील लाभार्थी
  • अत्यल्प भूधारक शेतकरी( एक हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • अल्प भूधारक शेतकरी (01 ते 02 हेक्टर पर्यंतचे भूधारक)
  • सु शिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयं रोजगार केंद्रात नोंद असलेले)
  • महिला बचत गटातील लाभार्थी.

ही योजना सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी राबवली जाते याची सर्वांनी नोंद घ्यावी.

या योजनेअंतर्गत ओपन (General) तसेच ओबीसी या दोन प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.

अनुसूचित जाती, जमातीसाठी(sc,st) या प्रवर्गांना शासनाच्या वतीने 75 टक्के अनुदान दिले जाते.

Innovative Plans – 2023 – : या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याच्या माध्यमातून शेतकरी वर्गाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने AH.Mahabms वरती अर्ज भरून घेतले जातात आणि याच्या नवीन अर्ज च्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

Innovative Plans – 2023

Innovative Plans – 2023 – : या योजनेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवल्यानंतर ही यादी 2025-26 पर्यंत चालणार आहे या योजनेमध्ये दरवर्षी अर्ज करण्याची आवश्यकता नाही याची सर्व शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.

या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेमध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र योजना या योजनेचा देखील अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

या योजनेच्या संदर्भात काही अडचणी जाणवल्यास तुम्ही खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता हा शासनाचा दिलेला नंबर आहे. 18002330418 किंवा टोल फ्री नंबर 1962 या नंबर वर सुद्धा संपर्क साधू शकतात धन्यवाद

Leave a comment

error: