Granted compensation for unseasonal rain | अवेळी पाऊस नुकसान भरपाई मंजूर

Granted compensation for unseasonal rain – : वर्ष 2023 मध्ये राज्यातील मार्च ,एप्रिल व मे महिन्यात अवेळी झालेल्या पावसामुळे तसेच गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी मदत वितरित करण्यासाठी राज्य शासना कडून मंजुरी देण्यात आलेली आहे.
नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 25 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण पाहूया.

Granted compensation for unseasonal rain – : शेतकरी मित्रांनो मार्च, एप्रिल व मे 2023 या महिन्यांमध्ये राज्यामध्ये अवेळी पाऊस झालेला होता. याच्या अगोदर राज्य शासनाने 9 व 14 मार्च 2023 रोजी गारपीटी व अवेळी झालेल्या पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे वितरण करण्याकरीता यापूर्वीच जीआर निर्गमित केलेला आहे.
परंतु, एप्रिल व मे महिन्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत मदतीचे वितरण करण्यात आलेले नव्हते. अशा शेतकऱ्यांसाठी 25 सप्टेंबर 2023 रोजी निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुनर्वसन धोरण लागू करण्यात आलेले आहे.

 • हे धोरण लागू करण्यासाठी राज्य शासनाच्या कडून 27 मार्च 2023 रोजी एक जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.
 • निर्गमित केलेल्या जीआरच्या नुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी (8500)आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्यासाठी एवढा निधी मंजूर केलेला आहे.
 • विविध प्रकारच्या फळबागांसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्यासाठी एवढा निधी मंजूर केलेला आहे।
 • तसेच बहुवार्षिक पिकांकरिता रुपये बावीस हजार पाचशे(22500) प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्यासाठी एवढा निधी मंजूर केलेला आहे.

वर्ष 2023 मध्ये मार्च एप्रिल व मे महिन्यामध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे तसेच गारपिटीमुळे डाळिंब ,द्राक्ष ,केळी, संत्रा, मोसंबी ,आंबे अशा विविध प्रकारच्या बागांचे नुकसान झाले होते. अशा सर्व नुकसान ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना निधीच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. Granted compensation for unseasonal rain

Granted compensation for unseasonal rain

शासन निर्णय पुढीलप्रमाणे – :

Granted compensation for unseasonal rain मार्च एप्रिल व मे 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रुपये पाच कोटी 59 लाख 38 हजार(₹ 559.38) एवढे नुकसान भरपाई वितरित करण्यास राज्य शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

हा निधी कोणत्या जिल्ह्यात वितरीत केला जाणार आहे.

 • अमरावती – : अमरावती जिल्ह्यातील मार्च व एप्रिल 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 927 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 742.18 हेक्टर. वितरित करावयाचा एकूण निधी 126.17 लक्ष एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • अकोला – : अकोला जिल्ह्यातील मार्च व एप्रिल 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 595 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 430.12 हेक्टर. वितरित करावयाचा एकूण निधी ७८.३५ एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • बुलढाणा – : बुलढाणा जिल्ह्यातील मार्च व एप्रिल 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 169 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 103.55 हेक्टर. वितरित करावयाचा एकूण निधी 18.08 एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • अमरावती – : अमरावती जिल्ह्यातील एप्रिल 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 01 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 1.78 हेक्टर. वितरित करावयाच्या एकूण निधी 0.30( तीस हजार) एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.

( अमरावती विभागातील एकूण 1692 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 22 लक्ष 90000 एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे)

 • पुणे – : पुणे जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 792 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 247.28 हेक्टर. वितरित करावयाचा एकूण निधी 73.09 (73 लाख 9 हजार) एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

( पुणे विभागातील एकूण 792 शेतकऱ्यांसाठी 73 लाख 9 हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे)

 • नागपूर – : नागपूर जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 34 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 18.05 हेक्टर वितरित करावयाचा एकूण निधी 3.92 एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • वर्धा – : वर्धा जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 36 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 23.08 हेक्टर
  वितरित करावयाच्या एकूण निधी 3.97 हजार एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • भंडारा – : भंडारा जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 2761 तसेच, शेती पिकांची बाधित क्षेत्र 963.54 हेक्टर वितरित करावयाचा एकूण निधी 163.86 हजार एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • गोंदिया – : गोंदिया जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 786 तसेच,. शेती पिकांचे बाधित क्षेत्र ३०६.०२ हेक्टर वितरित करावयाचे एकूण निधी 51.93 एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • चंद्रपूर – : चंद्रपूर जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 500 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 182.15 हेक्टर वितरित करावयाचा एकूण निधी 31.43 हजार एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.
 • गडचिरोली – : गडचिरोली जिल्ह्यातील मे 2023 या कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 77 तसेच, शेती पिकांचे बाधित क्षेत्र 48.72 हेक्टर वितरित करावयाचा एकूण निधी 8.28 हजार एवढा मंजूर करण्यात आलेला आहे.

( नागपूर विभागातील एकूण 4194 शेतकऱ्यांकरिता वितरित करावयाचा एकूण निधी 263.39 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.)

Granted compensation for unseasonal rain राज्यभरातील एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 6678 एवढी आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण 559.38 हजार एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजूर देण्यात आलेली आहे.

राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना

 • ही नुकसान भरपाई शेतकर्यांच्या खात्यात वितरित करीत असताना. बँकांनी कर्ज वसुलीसाठी अथवा इतर काही कारणासाठी वरती करू नये असे आदेश दिलेले आहेत.
 • या सूचनांचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवश्यक त्या सूचना बँकांना द्याव्यात.
 • राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असेल असे आदेश आहेत.

नुकसानग्रस्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांना या निधीच्या द्वारे मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे. 25 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेल्या जीआर च्या माध्यमातून हा निधी लवकरच वितरित केला जाणार आहे धन्यवाद. Granted compensation for unseasonal rain

Leave a comment

error: