Yellow mojack | पिवळा मोजॅक

सोयाबीन हे पीक राज्यभर मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. परंतु राज्यभरात पावसाचा मोठा खंड पडला होता. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता तसेच तापमानात बदल सारखेच होत राहिलेत असे विविध कारणामुळे शेती पिकातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे।

वरील प्रमाणे शेती पिकाचे नुकसान तर झालेच आहे तसेच सोयाबीन या पिकावर yellow mojack या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.

yellow mojack या रोगामुळे खालील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

  • लातूर ,नागपूर ,गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, यवतमाळ, वाशिम ,नांदेड आणि वर्धा विशेषतः हे जिल्हे yellow mojack या रोगामुळे जास्त सोयाबीन या पिकाचे नुकसान झाले आहे.

yellow mojack या रोगामुळे सोयाबीन पिके पिवळे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काही उत्पादन लागते का नाही याची शंका निर्माण झाली आहे.

पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळणार का ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Yellow mojack

yellow mojack या रोगा वरील विषयावर 3 आक्टोंबर 2023 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत झालेल्या पिकांच्या नुकसानी करिता संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहू.

कृषी विभागाच्या माध्यमातून हे पंचनामे करण्यात येणार आहेत. या पंचनामाचा अहवाल आता सादर करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी yellow mojack या रोगाच्या प्रादुर्भावामुळे क्लेम केलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो.

मदत व पुनर्वसन धोरणानुसार पेस्ट अटॅक ही बाब नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहे. आता कृषी विभागाच्या अहवाल सादर झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF आणि SDRF अंतर्गत पात्र केले जाऊ शकते.

सोयाबीन पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

  • राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोजक हा विषाणूजन्य रोग तसेच खोडकूच , मुळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
  • कृषी विभाग आणी मदत व पुनर्वसन विभागाला संयुक्त पणे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

हा रोग वरील सांगितल्याप्रमाणे राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी याचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल. धन्यवाद

Leave a comment

error: