Modi Awas Gharkul Yojana | मोदी घरकुल योजना

Modi Awas Gharkul Yojana – : राज्यातील विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांचा मोदी आवाज घरकुल या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यांचा समावेश 27 ऑक्टोबर 2023 रोजी जीआर निर्गमित केलेला आहे. या जीआर च्या माध्यमातून राज्यभरातील विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश करून मंजुरी देण्यात आलेली आहे.

Modi Awas Gharkul Yojana – : राज्यभरातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत 2023 24 मध्ये तीन लाख घरकुले देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे.

28 जुलै 2023 च्या शासन निर्णया नुसार राज्यभरात मोदी आवास घरकुल योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Modi Awas Gharkul Yojana – : राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी. आवास प्लस प्रणाली मध्ये नोंद झालेले लाभार्थी परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे नाव कमी झालेले पात्र लाभार्थी. जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले पात्र लाभार्थी.

वरील सर्व लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत. याच्यामधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यास किंवा अस्तित्वात असलेले कच्च्या घराचे पक्या घरात रूपांतर करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये(120,000) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांना कमीत कमी 269 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम करणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रिया

 • इतर मागा स प्रवर्गातील लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायत मार्फत करण्यात येईल.
 • निवड झालेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करून घरकुलांचे प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे पाठवले जातील.
 • निवड समिती ही निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करणार आहे.

पात्रता

 • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
 • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागा स प्रवर्गा तील असावा.
 • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा जास्त नसावे.
 • लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा (15)वर्षापेक्षा जास्त असावे.
 • लाभार्थ्या कडे स्वतःची अथवा शासना ने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थ्याचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
 • एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
 • लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा.(pwl)

आवश्यक कागदपत्रे

 • 7/12 उतारा / मालमत्ता नोंद पत्र / ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र
 • सक्षम प्राधिकार्‍याने दिलेल्या जातीचा प्रमाणपत्राची साक्षांक प्रत
 • आधार कार्ड / राशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / विद्युत बिल / मनरेगा / जॉब कार्ड यापैकी एकाची झेरॉक्स
 • स्वतःच्या बचत खात्याची पासबुकची झेरॉक्स

प्राधान्य क्षेत्र

लाभार्थी यादी पात्र करताना ग्रामसभेने विचारात घ्यावयाचे प्राधान्य क्षेत्र खालील प्रमाणे असावे.

 • घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा / परितक्त्या महिला / कुटुंबप्रमुख
 • पूरग्रस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी
 • जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान( आग, तोडफोड व इतर काही कारणामुळे) झालेली व्यक्ती.
 • नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्ती
 • दिव्यांग व्यक्ती – : उद्दिष्टांच्या किमान पाच टक्के उद्दिष्ट दिमाग करिता राखीव ठेवणे आवश्यक आहे.
 • तसेच इतर पात्र कुटुंबे

अर्थसहाय्य वितरण.

 • घरकुल योजनेसाठी राज्य शासनाने घोषित केलेले अर्थसहाय्य
 • डोंगराळ व दुर्गम भागामध्ये घर बांधण्यासाठी किंवा कच्चे घर पक्के करण्यासाठी एक लाख तीस हजार रुपये
 • व सर्वसाधारण भागामध्ये घर बांधकामासाठी किंवा कच्चे घर पक्के करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहेत.

Modi Awas Gharkul Yojana

Modi Awas Gharkul Yojana – : मोदी आवाज घरकुल योजने संबंधित वरील प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावे व आपले स्वतःचे नाव प्रतीक्षा यादी मध्ये आहे का ? किंवा आपले नाव ग्रामपंचायत मार्फत घर बांधकामासाठी शिफारस केलेले आहे का ? याची संपूर्ण माहिती घ्यावी. धन्यवाद

Leave a comment

error: