PMFBY

पिक विम्या साठी 1 कोटी 69 लाख अर्ज दाखल.

PMFBY – : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगामा साठी सहभाग नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या शेवटच्या दिवसापर्यंत 1 कोटी 69 लाखा च्या वर पोहोचली. आता अर्ज नोंदणी ची छाननी सुरू झाली आहे अशी माहिती कृषी विभागा कडून सांगण्यात येत आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार कर्जदार गटातून पाच लाख 76 हजार अर्जाची नोंद झालेली आहे.
शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. 142 लाख हेक्टर च्या पुढे पेरणी होते त्याच्यामधील जवळजवळ 112 लाख 42 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे.

या वर्षी राज्य शासनाने शेतकऱ्याच्या रक्कम स्वतः भरण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया मध्ये विमा योजनेत सहभाग नोंदवता आला.

PMFBY – : पीक विमा योजनेत माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातून सर्वात जास्त सहभाग नोंदवण्यात आला आहे.

PMFBY – : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत एकूण 18 लाख 48 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून महाराष्ट्रातील एक नंबरचा जिल्हा ठरला आहे.

व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वात कमी सहभाग प्रधान मंत्री पीक विमा योजनेत नोंदवला आहे तो आकडा म्हणजे 2 लाख 5 हजार इतका आहे.

Leave a comment

error: