Annasaheb Patil Loan Scheme 2023 | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Scheme या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करतात. या योजनेचा लाभ कोणाला होतो. या योजनेद्वारे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीची संधी दिली जाते. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या योजनेविषयी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

Annasaheb Patil Loan Scheme या योजनेचा लाभ घेऊन बेरोजगार तरुण विशेषतः ग्रामीण भागातील तरुण युवक स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करून व्यवसाय उभा करण्यासाठी भाग भांडवल म्हणजेच पैसा उपलब्ध करू शकतात आणि आलेल्या पैशातून स्वतःचा व्यवसाय उभे करू शकतात.

Annasaheb Patil Loan Scheme – : अण्णासाहेब पाटील महामंडळ या मंडळा अंतर्गत ही योजना चालवली जाते. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मराठा समाजातील तरुणांसाठी व्यवसाय उभा करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण ही योजना फक्त मराठा समाजासाठी चालवली जाते या योजनेचा लाभ मराठा समाजातील तरुण व तरुणी दोघेही घेऊ शकतात.

असा करा ऑनलाईन अर्ज

 • सुरुवातीला
  https://udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळाला सर्च करा.( या वेबसाईटवर जाऊन सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे)
 • User ID आणि Password टाकून लॉग इन करा.( यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय मध्ये नोंदणी करणे गरजेचे असते. हे नोंदणी केली नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात जाऊन सुरुवातीला नोंदणी करा)
 • युजर आयडी आणि पासवर्ड टाकून झाल्यावर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काही सूचना दिसतील त्या व्यवस्थित वाचून घ्या.
 • तुमचा जिल्हा निवडा
 • तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयाच्या आत आहे का अशी एक सूचना तुम्हाला येईल. जर तुमची उत्पन्न आठ लाखाच्या मध्ये येत असेल तर होय या बटनावर क्लिक करा.
 • अर्जदाराने त्याची वैयक्तिक माहिती भरायची आहे. जसे की अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे आडनाव, अर्जदाराचा जन्म दिनांक, अर्जदाराचा आधार क्रमांक, अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, ई-मेल, अर्जदार पुरुष/स्त्री जे आहे ते टाकायचे आहे. हे सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा. Annasaheb Patil Loan Scheme

वरील सर्व व्यवस्थित माहिती भरल्यानंतर सुरुवातीला कर्ज प्रकरणाची फाईल बँकेत सबमिट करायचे आहे त्यासाठी तुम्हाला बँकेसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे

 • केवायसी डॉक्युमेंट
 • जागेचे कागदपत्रे लागतील.( स्वतःची जागा असेल तर स्वतःच्या जागेचे कागदपत्र/भाड्याची जागी असेल तर भाड्याच्या जागेचे कागदपत्र म्हणजे भाडेपत्रक)
 • पहिला व्यवसाय असेल तर आयटी रिटर्न द्यावा लागेल.
 • व्यवसाय सुरू करत असाल तर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी जोडावा लागेल.
 • सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.
 • सर्वात महत्त्वाचं म्हणजे (Project Report) प्रकल्प अहवाल बँकेमध्ये सादर करणे आवश्यक आहे.( प्रोजेक्ट रिपोर्ट सर्वात महत्त्वाचा आहे याच्या वर ठरवले जाते तुम्हाला किती लोन द्यायचे किंवा तुम्ही लोन देण्याच्या पात्र आहात की नाही त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट लक्षपूर्वक करणे आवश्यक आहे)

अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत कर्ज तपशील

 • जो व्यवसाय अर्जदार करत आहे त्या व्यवसायाचे नाव दिलेले चौकटीत टाका.
 • अर्जदार त्या व्यवसायातून वार्षिक किती उत्पन्न कमावतो या संदर्भात माहिती त्या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये भरा.
 • अर्जदाराला बँकेकडून किती कर्ज स्वरूपात रक्कम हवी आहे त्याची सविस्तर माहिती भरा. आणि अर्ज जतन करा.

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

 • या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे अपलोड करावे लागतात त्यांची माहिती
 • आधार कार्ड समोरील आणि पाठीमागील बाजू अपलोड करणे गरजेचे आहे. अपलोड केल्या जाणाऱ्या फाईल ची साईज दहा एमबी च्या आत असणे गरजेचे आहे व त्या फाईलचा फॉरमॅट JPG,PNG किंवा PDf पीडीएफ स्वरूपात असणे गरजेचे आहे.
 • उत्पन्नाचा दाखला अपलोड करणे गरजेचे आहे परंतु उत्पन्नाचा दाखला नसेल तर कुटुंबातील प्रमुखाचा ITR देखील अपलोड करता येतो.
 • शाळा सोडल्याचा दाखला. व इतर काही कागदपत्रे ती देखील त्या ठिकाणी अपलोड करून घ्या.

सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर शपथपत्र दिसेल ते शपथपत्र व्यवस्थित वाचून घ्या सर्व वाचून झाल्यानंतर I Agree या बटनावर क्लिक करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या अर्जाचा क्रमांक मिळेल त्याच प्रमाणे LOI पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.

योजनेची स्थिती तपासण्यासाठी

Annasaheb Patil Loan Scheme – : आपण दाखल केलेल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी महास्वयं या वेबसाईटला भेट द्या. या ठिकाणी तुम्ही तुमच्या अर्ज मंजूर झाला आहे की नामंजूर झाला आहे. याची सविस्तर माहिती पाहू शकता.( ही माहिती सविस्तर पाहण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे)

 • ठिकाणी अर्ज क्रमांक
 • अर्ज केल्याची तारीख त्या ठिकाणी दिसेल.
 • योजनेचे नाव
 • अर्ज केलेल्या योजनेची स्थिती
 • LOI
 • बँकेचे स्वीकृत पत्र त्या ठिकाणी अपलोड केलेले असेल

वरील सर्व माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ती सविस्तर वाचून पहा.

वरील प्रमाणे सर्व माहितीच्या आधारे तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळात अर्ज करू शकता.

या योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती खालील प्रमाणे

 • अण्णासाहेब पाटील ही योजना जी व्यक्ती व्यावसायिक करत आहे तसेच नवीन व्यवसाय करू इच्छित आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे.
 • अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे आवश्यक आहे.
 • सगळी फाईल व्यवस्थितपणे तयार केल्यानंतर सुरुवातीला बँकेमध्ये दाखल करायचे आहे.
 • तुम्हाला बँकेमधून फाईल मंजूर झाल्यानंतर लेटर देण्यात येते. सांगशील लेटर घेऊन अण्णासाहेब पाटील महामंडळ ऑफिस मार्फत चालवल्या जाते ते ऑफिस म्हणजे रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय या ठिकाणी जायचे आहे.
 • त्या ठिकाणी जाऊन मंजूर झालेली फाईल चे संक्शन लेटर व महामंडळाचा प्रकल्प अहवाल फॉर्म भरून द्यायचा आहे.

Annasaheb Patil Loan Scheme – : अण्णासाहेब पाटील योजनेचा लाभ घेणाऱ्या यांनी सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी ती म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचे करायचे आहे आणि त्यानंतर प्रोजेक्ट फाइल आणि लागणारी सर्व बँकेचे कागदपत्रे वरील सांगितल्याप्रमाणे पूर्ण करून बँकेमध्ये फाईल दाखल करायचे आहे त्याच्यानंतरच रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात जायचे आहे.

अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक व्याज परतावा योजना. आणि गट कर्ज व्याज परतावा योजना. या दोन्ही योजना बँके थ्रो राबवल्या जातात

 • वैयक्तिक व्याज परतावा योजना याच्या अंतर्गत 15 लाख रुपये कर्ज मिळते.
 • या योजनेअंतर्गत पुढील सात वर्षांपासून अण्णासाहेब पाटील महामंडळ येणारे व्याज भरते.
 • गट कर्ज व्याज योजना याच्या अंतर्गत पार्टनरशिप मध्ये व्यावसायिक करण्यासाठी आहे.
 • गट कर्ज या योजनेमध्ये दोन पार्टनर असतील तर 25 लाख रुपये कर्ज मिळते.
 • तीन पार्टनर असतील तर 35 लाख रुपये कर्ज मिळते
 • चार पार्टनर असतील तर 45 लाख रुपये कर्ज मिळते.
 • पाच पटणाऱ्या असतील तर 50 लाख रुपये मिळते.

वरील प्रमाणे पार्टनरशिप मध्ये व्यवसाय असेल तर 25 लाखापासून ते 50 लाखापर्यंत कर्ज प्रकरणे तुम्ही दाखल करू शकतात.

Annasaheb Patil Loan Scheme

Annasaheb Patil Loan Scheme महामंडळात अंतर्गत अर्ज करताना सविस्तर पहिली माहिती घ्या त्याच्यानंतरच अर्ज दाखल करा कारण ही योजना खूप चांगली आहे. या योजनेतून ूप सार्‍या तरुणांचे व्यवसायाचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे तुम्ही देखील अशा योजनेमध्ये सहभाग नोंदवून स्वतःचा व्यवसाय करा धन्यवादAnnasaheb Patil Loan Scheme

Leave a comment

error: