PICK MONEY | पीक पैसेवारी

PICK MONEY – : पिक पैसेवारी अतिवृष्टी पावसाच्या खंड किंवा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती मुळे शेती पिकांचे नुकसान झाले तर त्या नुकसान निश्चित करण्यासाठी खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल या पिकांची उत्पादकता निश्चित करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते त्या पद्धतीला पीक पैसेवारी असे म्हणतात.

” महाराष्ट्र जमीन महसूल कायदा1966 अंतर्गत कलम 78 नुसार ,पैसेवारी चे आपत्तीनुसार ,जमीन महसूल तहकूब ,कमी वा रद्द्द करण्यास समर्थन म्हणून शासना चा महसूल विभाग प्रत्येक गावातील कोरड वाहू ,रब्बी आणि खरीप पिकांची पैसेवारी काढतो. त्यालाच पूर्वी आणेवारी असे म्हणत. परंतु त्याला आता पैसेवारी असे म्हणतात.”

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यात तील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पावसाचे खंड पडलेला आहे. पिक योजना अंतर्गत अधिसूचना काढली जाते. ही आधी सूचना काढण्यासाठी हंगामी पैसेवारी येणे आवश्यक असते. ही हंगामी पैसेवारी कशी काढली जाते. हंगामी पैसेवारी म्हणजे काय?
हंगामी पैसेवारी कोणत्या माध्यमातून काढली जाते. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काही सहभाग असतो का ? पैसेवारी काढणाऱ्यांची समितीमध्ये कोण कोण असते ? पैसेवारी काढण्याची वेळापत्रक आहे का तर पैसेवारी कधी काढली जाते. याचा काही शेतकऱ्याला फायदा होतो का ?
होत असेल तर किती होतो ? वरील पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळतील तर हा ब्लॉग तुम्ही सविस्तरपणे वाचा.

खरीप हंगामासाठी खालील प्रमाणे माहिती आहे.

पैसेवारी तीन पद्धतीने काढले जाते

1) हंगामी पैसेवारी ( प्रचलित पैसेवारी)
2) सुधारित पैसेवारी
3) अंतिम पैसेवारी

1) हंगामी पैसेवारी( प्रचलित पैसेवारी) – : हंगामी पैसेवारी ही पैसेवारी कोकण ,पुणे ,नाशिक या विभागांसाठी 15 सप्टेंबर रोजी जाहीर केले जाते.

 • हंगामी पैसेवारी हे पैसे वारी छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती या विभागांसाठी 30 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाते.

2) सुधारित पैसेवारी – : सुधारित पैसेवारी ही पैसेवारी कोकण, पुणे ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर या विभागांसाठी 31 ऑक्टोंबर या दिवशी जाहीर केली जाते.

 • सुधारित पैसेवारी नागपूर ,अमरावती या विभागांसाठी सुद्धा 31 ऑक्टोबर या दिवशी जाहीर केले जाते

3) अंतिम पैसेवारी – : अंतिम पैसेवारी ही पैसेवारी कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर या विभागांसाठी 15 डिसेंबर या दिवशी जाहीर केले जाते.

 • अंतिम पैसेवारी ही पैसेवारी नागपूर, अमरावती या विभागांसाठी 31 डिसेंबर या दिवशी जाहीर केली जाते.

रब्बी हंगामासाठी खालील प्रमाणे माहिती वाचावी.

1) हंगामी पैसेवारी – : कोकण विभागामध्ये हंगामी पैसेवारी जाहीर केली जात नाही.

 • हंगामी पैसेवारी पुणे ,नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर या विभागांसाठी 31 डिसेंबर या दिवशी जाहीर केली जाते.
 • हंगामी पैसेवारी नागपूर, अमरावती या विभागांसाठी 15 जानेवारी या दिवशी जाहीर केली जाते.

2) सुधारित पैसेवारी – : कोकण विभागात सुधारित पैसेवारी जाहीर केली जात नाही.

 • सुधारित पैसेवारी पुणे ,नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये 31 जानेवारी या दिवशी जाहीर केली जाते.
 • सुधारित पैसेवारी नागपूर अमरावती या विभागामध्ये 15 फेब्रुवारी या दिवशी जाहीर केली जाते.

3) अंतिम पैसेवारी – : कोकण विभागात अंतिम पैसेवारी जाहीर केली जात नाही.

 • अंतिम पैसेवारी पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये 15 मार्च या दिवशी जाहीर केली जाते.
 • अंतिम पैसेवारी नागपूर अमरावती या विभागामध्ये 15 मार्च या दिवशी जाहीर केली जाते.( नागपूर व अमरावती विभागात पैसे वारीसाठी तुरीला रब्बी पिक समजले जाते )

पैसेवारी समिती पुढील प्रमाणे

पैसेवारी काढण्यासाठी एक समिती गठीत केल्या जाते त्या समितीमध्ये कोण कोण असते ते खालील प्रमाणे.

 • राजेश निरीक्षक किंवा तत्सम अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतात.( महसूल मंडळ अधिकारी)
 • ग्रामसेवक हे सदस्य असतात.
 • सरपंच सदस्य असतात.
 • प्रगतशील शेतकरी हे देखील सदस्य असतात.
 • सहकार पतपुरवठा संस्थेचे अध्यक्ष हे या समितीचे सदस्य असतात.
 • अल्पभूधारक शेतकरी ( दोन शेतकरी सदस्य असतात. यामधील एक महिला सदस्य असावी असा प्रघात आहे)
 • तलाठी हे देखील सदस्य असतात.
 • कृषी सहाय्यक हे एक सदस्य असतात.

प्रमाण उत्पन्न कसे निश्चित केले जाते.

 • केंद्र शासनाच्या सूचनानुसार मागील पाच वर्षाचे सरासरी उत्पन्न हे प्रमाण उत्पन्न समजावे. याप्रमाणे उत्पन्नाचे मूल्यांकन 100 पैसे समजावे. त्याच्यानुसार पैसेवारी जाहीर करण्यात यावी. हे प्रमाण उत्पन्न निश्चित करण्यासाठी कृषी विभागा तर्फे प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पिकांचे कमीत कमी 25 कापणी प्रयोग घेतले जावेत.

पैसेवारी काढण्याचे सूत्र

प्रमुख पीक निश्चित कसे केले जाते

 • गाव पातळीवर पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये होत असलेले बदल लक्षात घेता. प्रमुख पीक निश्चित करताना 80 टक्के क्षेत्र लागवडीखाली असावे. ( त्या त्या भागातील ज्या पिकाची सर्वात जास्त लागवड झाली आहे. असे पीक प्रमुख प्रमुख पीक म्हणून निवडले जाते.)

एक कापणी प्रयोगांची निवड व संख्या

 • प्रमुख पीक कापणे ग्रामपंचायत वार करण्यात यावी. प्रमुख पिकांची किमान सहा पीक कापणे प्रयोग घेण्यात यावे. म्हणजे प्रमुख पिकांचे एका ग्रामपंचायती अंतर्गत कमीत कमी सहा कापणी प्रयोग घेणे आवश्यक राहील.
 • पीक कापणी प्रयोगाची सर्व जबाबदारी महसूल विभागाकडे राहील. परंतु ग्रामपंचायत हे घटक धरून ग्रामपंचायत वार प्रयोग करण्यात यावा. पिका प्रयोग करण्यासाठी शेती निवडण्यासाठी कृषी विभागाचे अधिकाऱ्याची मदत घेण्यात यावी.

पैसेवारी जाहीर करण्यासाठी लागणारे घटक

 • पैसेवाली जाहीर करण्याकरिता महसूल गाव हा घटक ग्राह्य धरण्यात यावा व महसुली गावावर पैसेवारी जाहीर करण्यात यावी.
  ( पैसेवारी ही तीन हंगामामध्ये जाहीर केली जाते)

सरासरी

 • ग्रामपंचायत न्यायप्रमुख पिकांच्या कापणी प्रयोग झाल्यानंतर महसूल गावने प्रत्येक प्रमुख पिकांचे प्रेरणे क्षेत्राचा प्रमाण व कापणी पूर्वगांती आलेले पैसेवारी या सर्वांच्या केलेल्या कामाला भारांकित सरासरी असे म्हणतात त्या सरी सरीचा आकडा त्या महसुली गावाची पैसेवारी म्हणून जाहीर करण्यात यावा.

खरीप व रब्बी पैसेवारी

 • सर्व खरीप गावांमध्ये खरीप हंगामामध्ये पैसेवारी घोषित करण्यात यावी तसेच रब्बी गावांमध्ये खरीप हंगामात दोन ऑब्लिक तीन किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असेल तर रब्बी गावच्या सुद्धा खरीप हंगामामध्ये पैसेवारी घोषित करण्यात यावी

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष पुढीलप्रमाणे

 • राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुष्काळ मॅन्युअल 2009 मधील निकष ग्राह्य धरण्यात यावे.
 • दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक पैसेवारी हा निकष प्रमुख निकष म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.
 • पर्जन्यमान – :
  – जून व जुलै महिन्यामध्ये एकूण सरासरीच्या 50% पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ जाहीर करावा.
  – संपूर्ण मान्सून कालावधीत सरासरीच्या 75 टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यास दुष्काळ जाहीर करावा.
  – संपूर्ण मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंड पडल्यास व त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाल्यास किंवा नुकसान झाल्यास याचा विचार करण्यात यावा.
 • लागवडीखालील क्षेत्र – :
  – एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत झालेल्या पेरणीचे प्रमाण 50% पेक्षा कमी असल्यास
 • सामान्य फरक वनस्पती निर्देशांक 0.4 किंवा त्यापेक्षा कमी असल्यास
 • आद्रता परिणाम 50% पेक्षा कमी असल्यास
 • पैसेवारी 50% पेक्षा कमी असल्यास दुष्काळ जाहीर करण्यासाठी कामी येते.
 • इतर निकष चारा परिस्थिती पिण्याच्या पाण्याची उपलब्धता इत्यादी

PICK MONEY

दुष्काळ जाहीर करण्याची पद्धती

 • दुष्काळ जाहीर करण्यासाठी महसुली गाव हा एक घटक राहील.
 • वरील प्रमाणे सांगितलेले निकष याच्यामध्ये लागू होतात म्हणजे वरील सर्व जे निकष मी आता सांगितले तेच निकष याच्या मध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धतीमध्ये येतात.

दुष्काळग्रस्त गावांना राज्य शासनाची द्वारे केल्या जाणाऱ्या उपाययोजना/ सोयी / सवलती खालील प्रमाणे

 • जमीन महसुलात सूट दिली जाते.
 • सहकार्य कर्जाचे पुनर्गठन केले जाते.
 • शेतशी निगडित कर्जाच्या वसुलीत स्थगिती दिली जाते.
 • कृषी पिंपळाच्या चालू वीजबिलात 33.5% इतकी सूट दिली जाते.
 • शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट दिली जाते.( माफ केले जाते)
 • रोहिवांतर्गत कामाच्या आणि कशात काही प्रमाणात शितलता दिली जाते.
 • ज्या गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीरे अशा गावात टँकर चा वापर केला जातो.
 • टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे.

निविष्ठा अनुदान वाटप ( निकषानुसार)

 • ज्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्या गावातील कोरडवाहू शेती करणाऱ्या व 33 टक्के पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषानुसार निविष्ठा अनुदान देण्यात येईल.
 • त्या गावात घेण्यात आलेल्या पीक कारणे प्रयोगाच्या निकालानुसार पी की कापणी निहाय उत्पन्नाचा आधार घेऊन 67% पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कोरडवाहू पिकाखालील क्षेत्रात निविष्ठा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात येतील.
 • जे शेतकरी पात्र करण्यात येतील अशा शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वाटप केले जाईल.
 • ग्रामपंचायत स्तरावर पीक निहाय काढण्यात आलेले उत्पन्न हे त्या ग्रामपंचायतीमधील सर्व गावाला नियम लागू राहील.
 • ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत व त्या विहिरीवर ते बागायती शेती करतात अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही.

NDRF च्या नियामानुसार सर्व मदत केली जाते.

PICK MONEY – : दुष्काळ कसा जाहीर केल्या जातो. पीक पैसेवारी म्हणजे काय याची सविस्तर माहिती वाचून घ्या. धन्यवाद

Leave a comment

error: