Women’s self-help group | महिला बचत गट

राज्य शासनाच्या माध्यमातून बचत गटाशी जोडून असलेल्या महिलांसाठी शासनाकडून खुशखबर आहे.

Women’s self-help group – : महिला बचत गटांना दिला जाणारा फिरता निधी दुप्पट करण्यात आलेला आहे. तसेच बचत गटाशी निगडित असलेल्या सर्व सखींचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे. याच्यात संदर्भातील नवीन जीआर 26 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आला आहे. या जीआर च्या माध्यमातून शासनातर्फे मानधन किती दिले जाणार आहे काय बदल केले आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया.

Women’s self-help group – : केंद्र सरकारचा 60 टक्के निधी व राज्य सरकारचा 40% निधी या निधीच्या पार्श्वभूमी वरती दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जिवनोती अभियान राबवले जाते. 2011 पासून राज्यात हे अभियान राबवण्यासाठी उमेद ची स्थापना करण्यात आली. उमेद च्या माध्यमातून राज्यभरामध्ये वरील दोन्हीही अभियान राबवले जातात. हे अभियान राज्यातील 34 जिल्ह्यां मधील 351 तालुक्यामध्ये राबवले जाते.

Women’s self-help group – : राज्यभरातील लाखांच्या वरील महिला उमेद च्या माध्यमातून बचत गटाशी निगडित आलेल्या आहेत. संपर्कात आलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. तसेच स्वतःचे जीवन सुखी व संपन्न करण्याचे माध्यम मिळाले आहे.

Women’s self-help group – : राज्यभरातील बऱ्याचशा महिला देखील काम करतात. त्याच्यामध्ये सखी भगिनी असतील, कृषी सखी, वन सखी, बँक सखी, अशा विविध विभागात काम करणाऱ्या सखी बहिणींना या जीआर च्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे.

Women’s self-help group

स्वयंसहायता गटांना अतिरिक्त फिरता निधी – :

 • राज्यभरातील बचत गटांची अ गट, गट ब, गट क असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
 • गट अ – : गट अ या स्वयं सहायता गटांचा फिरता निधी 15000 च्या ऐवजी थेट 30000 करण्यात आलेला आहे।
 • गट ब आणि गट क – : गट अ आणि गट ब या गटांना स्व सहाय्यता बचत गटांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार फिरता निधी पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे.

मानधन ( मासिक वाढ )

 • प्रेरिका (Icrp) / सखी यांच्या मानधनामध्ये थेट दुप्पट वाढ करण्यात आलेले आहे. म्हणजे 3000 वरून थेट सहा हजार एवढी वाढ करण्यात आली आहे.
 • बँक सखी – ; बँक सखी साठी हे मानधन सहा हजार रुपये असणार आहे.
 • आर्थीक साक्षरता सखी – : आर्थिक साक्षरता सखी यांचे मानधन 3000 होऊन थेट सहा हजार करण्यात आले आहे.
 • पशु सखी – : पशु सखी यांचे मानधन 3 हजाराहून थेट 6000 करण्यात आले आहे.
 • कृषी सखी – : कृषी सखी यांचे मानधन 3 हजाराहून थेट 6000 करण्यात आले आहे.
 • मत्स्य सखी – : मत्स्य सखी यांचे मानधन तीन हजारांहून थेट 6000 करण्यात आले आहे.
 • वन सखी – : वनसखी यांचे मानधन तीन हजाराहून थेट 6000 करण्यात आले आहे.
 • मास्टर कृषी (crp) – : मास्टर कृषी यांचे मानधन साडेचार हजाराहून थेट सहा हजार करण्यात आले आहे.
 • कृषी उद्योग सखी – : कृषी उद्योग सखी यांचे मानधन साडेतीन हजाराहून थेट सहा हजार करण्यात आले आहे.
 • बिझनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन ( bdsp) – : बिझनेस डेव्हलपमेंट सपोर्ट पर्सन यांचे मानधन साडेतीन हजाराहून थेट 6000 करण्यात आले आहे.
 • कृती संगम सखी – : कृती संगम सखी या सखींचे मानधन साडेचार हजाराहून थेट 6000 करण्यात आले आहे.

हे अभियान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येणार आहे. तरी सर्व काम करत असलेल्या सखिना ना मार्च 2026 पर्यंत वरील मानधन दिले जाणार आहे.

महिला बचत गट

उमेद – : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका सखी यांच्या मासिक मानधनात वाढ करणे तसेच अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता समूहाच्या फिरता निधी दुप्पट करणे बाबत

Women’s self-help group – : राज्य शासनाच्या माध्यमातून काम करत असलेल्या विविध विभागातील सखींनला विविध प्रकारच्या कामासाठी फिरता निधी हा दुप्पट करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या मासिक मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. या वाढीमुळे काम करत असलेल्या सखीं ना दिलासा मिळाला आहे.

Leave a comment

error: