Tribal Development Scheme | आदिवासी विकास योजना | Tribal Better Scheme In State Government

आदिवासी विकास योजना मनरेगा द्वारे अभिसरणाच्या माध्यमातून राबवण्यासाठी राज्य शासनाकडून दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून आदिवासी विकासाच्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जाणार आहेत यासंबंधीची आपण आज माहिती पाहणार आहोत.

राज्यांमधील आदिवासी भौगोलिक भाग ( मेळघाट, पालघर) जे काय आहेत. अशा भागामध्ये मनरेगाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अकुशल ची कामे केली जातात. परंतु या भागामध्ये कुशलच्या निधी शिल्लक राहतो. कुशल च्या कामाची लाभार्थ्याच्या माध्यमातून मागणी केली जात नाही किंवा इतर बरीचशी कारणांनी ते होत नाहीत. म्हणून कुशलचा निधी तसाच शिल्लक राहतो.

या भागातील गावांना रस्त्याने एकमेकाला न जोडल्या गेल्याने तेथे राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ये जा करण्यासाठी त्रास होतो. आशा अडचणीमुळे या योजना मनरेगाच्या माध्यमातून राबवल्यास या ठिकाणी गाव वस्त्या रस्त्याच्या माध्यमातून एकमेकाला जोडण्यासाठी अभिसरणाच्या माध्यमातून आदिवासी पाडे ,गावे ,वाडी ,वस्त्यांना जोडणे शक्य आहे.

Tribal Development Scheme – : राज्यातील आदिवासी भागांमध्ये स्थलांतरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे मनरेगाला मागील त्याला काम या तत्त्वावर राबविल्यास आदिवासी समाजाचे गुजरेपणा तसेच भौगोलिक विलगीकरण होण्यास मदत होईल.

आदिवासी भागातील प्रत्येक गावास एक युनिट म्हणून ओळखण्यात येईल. प्रत्येक गावाचा विकास व्हावा याच्यासाठी दशवार्षिक नियोजन करण्यात येईल. येणाऱ्या कालावधीमध्ये आदिवासी पाडे, गाव, वाडी ,वस्त्यांना सर्वांगीण विकास करण्यात यावा. याच्यासाठी आदिवासी विकास विभाग व मनरेगा या दोन विभागाच्या योजनांचे अभिसरण करून आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी समाजातील लोकांचे गरिबांच्या आयामावर आघात करण्यासाठी सर्व निगडित बाबींचा विचार करून शासनातर्फे कामे करण्यात यावी.

आदिवासी भागातील गावांच्या विकास करण्याच्या दृष्टीने तेथील लोकांना विहीर, फळबाग ,बांधावर लावणी जाणारे झाडे, गाई ,गोठे आणि शेती संबंधित लागणारे काही साहित्य इत्यादी मनरेगाच्या माध्यमातून अनुदेय बाबींचा लाभ देण्यात येईल. तसेच तेथील नागरिकांना उत्पादन वाढावे या उद्देशाने शेळी, गाई ,म्हशी, कोंबड्यांची पिल्ले, पंप ,सोलर पंप, विज जोडणे ,तुषार सिंचन अशा विविध गोष्टींचा लाभ आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.

आदिवासी भागात राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा या त्यांना त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.

आदिवासी पाडे गाव वाडिया वस्त्यांमध्ये राहत नाहीत परंतु जिल्ह्यांमध्ये कुठेतरी पालामध्ये वास्तव्य करीत आहेत अशा कुटुंबातील 0 ते 14 वयोगटातील मुलांची यादी संबंधित ठिकाणी च्या अंगणवाडी कार्यकर्ते तसेच शिक्षकांच्या मदतीने उपलब्ध करून घेण्यात यावी.

अशा सर्व आदिवासी कुटुंबांना मनरेगाच्या कार्याचे नियोजन करण्यात यावे. यामध्ये प्रत्येक कुटुंबात सकस, संतुलित, विविध पूर्ण ,चवदार ,मुबलक आहार उपलब्ध करून देण्यात यावा.

तसेच या भागातील नागरिकांना त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढावे याकरिता योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे.

वैयक्तिक योजना

Tribal Development Scheme – : आदिवासी भागातील नागरिकांना वैयक्तिक कामांमध्ये शबरी घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधणे, शौचालय बांधकामासाठी शोष खड्डे तयार करणे. फळबाग, फुल शेती, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम शेती, विहीर ,शेततळे ,गाय, गोठा बांधकाम, शेळी पालन, शेड कुक्कुटपालन शेड इत्यादी कामाची मनरेगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे.

ज्या आदिवासी नागरिकांकडे स्वतःच्या जमिनी आहेत त्यांना वरील सांगितल्याप्रमाणे सर्व योजना देण्यात याव्यात असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ज्या आदिवासी नागरिकांकडे स्वतःच्या जमिनी नाहीत अशा नागरिकांसाठी स्वसहाय्यता गट प्रोड्युसर कंपनी त्यांच्यासाठी जमिनी उपलब्ध करून देऊन सामूहिक योजना राबविण्यात याव्यात. गायरान, गावठाण किंवा शासकीय जमीन उपलब्ध असल्यास अशा जागेवरती सामूहिक मथा निर्माण करण्यात यावी. जागा उपलब्ध असल्यास समूह किंवा कंपनीने जागा विकत घ्यावी. तीस वर्षाच्या लीज ने ती जागा विकत घ्यावी. आणि त्या जागेवर मनरेगाच्या माध्यमातून मतदान करण्यात यावा.

Tribal Development Scheme

सार्वजनिक योजना

Tribal Development Scheme – : रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता हाती घेण्यात येणाऱ्या कामापैकी जी कामे गावे ,वाड्या व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता हाती घेता येऊ शकतात. ती कामे हाती घेणे शिवाय आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून वस्ती येथे आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे अंतर्गत रस्ते गटारे शौचालय तसेच समाज मंदिर वाचनालय व आवश्यक असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची कामे करणे ही सर्व कामे सार्वजनिक योजना म्हणून ओळखली जातात.

आश्रम शाळांनी करावयाची कामे

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक तसेच संस्था प्रमुखांनी आपल्या शाळेच्या भौतिक सुविधा व सुशोभीकरणासाठी मनरेगा अंतर्गत येणाऱ्या कामांचा वापर करून घ्यावा. मनरेगा अंतर्गत कार्य करीत असताना ही कामे 60:40 अकुशल कुशल घटकाच्या प्रमाणात बसले पाहिजेत. शाळेच्या आवारात उपलब्ध जागा असल्यास अधिक प्रमाणात वृक्ष लागवड करून काही प्रमाणात अकुशल वाढवता येणे शक्य आहे, तथापि शाळांनी मुलांच्या पालकांना त्यांच्या शेतात फळबाग, फुलशेती ,रेशीम शेती, वृक्ष लागवड, बांधावर वृक्ष लागवड ,विहीर, शेततळे, नाफेड, व्हर्मी कंपोस्ट अशी कुशल कामे घेण्यास प्रवृत्त करावे. या कामामुळे मुलांच्या पालकांकडे मत्ता निर्माण होऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन मजबूत होईल सोबतच शाळेच्या सुविधांसाठी कुशल निधी सुद्धा उपलब्ध होईल.

उदाहरणार्थ

  • आश्रम शाळेसाठी किचन शेड आश्रम शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वच ना आश्रम शाळा परिसराचा शोषखड्डा आश्रम शाळेसाठी मल्टी युटीलिटी शौचालय आश्रम शाळेसाठी खेळाचे मैदान आश्रम शाळेसाठी संरक्षण भिंत आवश्यकतेनुसार आश्रम शाळा परिसरात पेविंग ब्लॉक बसविणे.
    आश्रम शाळेसाठी परिसरात बाहेर काँक्रीट नाले बांधकाम करणे आश्रमशाळेकडे येणारे रस्ते गुणवत्ता पूर्ण करणे.
    बोरवेल पुनर्भरण शाळा अंगणवाडी बोरवेल असल्यास गांडूळ खत प्रकल्प.
    नाडेप कंपोस्ट

वस्तीग्रहा मध्ये करावयाची कामे

आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय वस्तीग्रह इमारतीचे बांधकाम करताना वस्तीगृहासाठी संरक्षण भिंत अंतर्गत रस्ते बांधकाम रेन वॉटर हार्वेस्टिंग रचना वृक्ष लागवड अशी कामे व सद्यस्थितीत असलेल्या इमारतीमध्ये ठिकठिकाणी वृक्ष लागवड गांडूळ खत प्रकल्प इत्यादी कामे करावी.

वरील सर्व कामे मनरेगा व आदिवासी विभाग यांचे अभिसरण करून केले जाणार आहेत. अशा सर्व कामामुळे तेथील नागरिकांची उपजीविका भागेल तसेच त्यांचे जगण्याचे साधन सुविधा यामध्ये वृद्धी होईल. या दृष्टिकोनातून या दोन्ही योजना अभिसरणाच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत.

Leave a comment

error: