TRACTOR SUBSIDY

ट्रॅक्टर अनुदान

कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन

शासन निर्णय

  • सन 2023 24 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये 37.8606 कोटी ( रुपये 37 कोटी 86 लाख 6 हजार फक्त )
  • या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा रुपये सव्वा लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीचा 40% किंवा रुपये एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येते.

TRACTOR SUBSIDY – : राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्ज मधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी सन 2023 24 या वर्षात रुपये 300 कोटी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

तरी जे शेतकरी राज्य कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर घेतल्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेत होते त्यांच्या खात्यात हे अनुदान लवकरच जमा होईल. असा शासन निर्णय 8 सप्टेंबर 2023 रोजी निघाला आहे .

TRACTOR SUBSIDY

Leave a comment

error: