शासन निर्णय

तलाठ्याने सज्जा मुख्यालय उपस्थित राहण्याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला आहे.

शासन निर्णय — : तलाठी हे पद सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पद असल्यामुळे आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो.

तसेच पिकाची पाहणी ई पिक पाहणी याची नोंद करणे. झालेल्या नुकसानाची पंचनामे करणे दुष्काळी परिस्थिती अति पर्जन्यमान नैसर्गिक आपत्ती या प्रत्येक ठिकाणी मुदत व पुनर्वसनाचे काम करण्याच्या हेतूने तलाठी शासनाचा दुवा आहे. परंतु, तलाठी हे सज्जाच्या ठिकाणी उपस्थित रहात नसल्याबाबत सर्वसामान्य नागरिकाकडून तसेच ,लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार शासनास तक्रार, सूचना ,निवेदने देण्यात येत असतात.

सद्यस्थितीत तलाठी यांच्याकडे एकापेक्षा जास्त गाव असल्यामुळे त्यांना सज्जा मुख्यालय राहण्याबाबत सज्जाच्या बाहेर वेळापत्रक लिहिण्याच्या सूचना राज्य शासनातर्फे करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार तलाठी गट क संवर्ग पदाची भरती घेत असून नवीन पद भरल्यानंतर तलाठी मुख्यालय ही तलाठ्यांची उपस्थिती दिसेल.

तलाठ्यांना सज्जातील गावांना भेटी देणे पंचनामे स्थळ पाहणे वरिष्ठ कार्यालयाकडे होणाऱ्या बैठका राजशिष्टाचार पहाणे तपासण्या या सर्व कामे उपस्थित रहावे लागते. त्याच्याशिवाय अपवादात्मक परिस्थितीमध्ये तलाठी यांना तलाठी सज्जा मुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही. बऱ्याच तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त गावे असल्यामुळे राज्य शासनाने तलाठ्यांचा कारभार असलेल्या सज्जाच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित असणे आवश्यक आहे. जोपर्यंत तलाठी भरती होऊन उमेदवार उपलब्ध होत नाहीत. तोवर कोणत्याही प्रकार ची सर्व सामान्य जनते ची गैरसोय होऊ नये. याच्यासाठी सज्जाच्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत कार्यालय यांच्या सूचनाफलकावर कोणत्या गावाला कधी भेट देणार आहेत याचे ” वेळापत्रक ” लावावे.

तलाठी पदाची भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत तलाठ्यांनी गाव ग्रामपंचायतच्या दर्शनीय भागात सूचनाफलक आगाव वेळेत लावावा.

— : तलाठ्यांनी सध्या कार्यालयीन ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत वेळापत्रक निश्चित करून संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनीय भागा आगाऊ वेळेत लावावे.

— : तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनीय भागात स्वतःचा दूरध्वनी क्रमांक तसेच सज्जा मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचा दूरध्वनी क्रमांक सुद्धा टाकावा.

शासन निर्णय

सर्वसामान्य माणसाची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी.असे निर्देश शासनाने दिलेले आहेत.

Leave a comment

error: