Subsidy for fertilizer | खतासाठी अनुदान | New Scheme In State Government

Subsidy for fertilizer – : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने मध्ये बदल करून शेतकऱ्यांना रासायनिक आणि सेंद्रिय खत देण्यासाठी राज्य सरकार तर्फे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी मंजुरी दिनांक 21 सप्टेंबर 2023 या दिवशी शासन निर्णय निर्गमित करून देण्यात आली आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून फळबाग लागवडी करिता राज्य शासनाच्या माध्यमातून फळ पिकांच्या लागवडीकरिता इस्टिमेट जाहीर करण्यात आले आहे. याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांना रासायनिक आणि सेंद्रिय खत घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

Subsidy for fertilizer – : राज्यामध्ये मनरेगाचे अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. परंतु ही योजना फक्त जॉब कार्डधारक शेतकऱ्यांना दिली जाते. या योजनेमध्ये अत्यल्प क्षेत्र असलेले व अल्पभूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी या सर्वांना फळबाग लागवडीकरिता दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते.

परंतु राज्यामध्ये अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकरी असून देखील त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याकारणाने अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी 2018 मध्ये राज्य शासनामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. दहापेक्षा अधिक फळबाग लागवडीकरिता या योजनेच्या अंतर्गत अनुदान देता येते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत याच्या अगोदर ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जात होते.

Subsidy for fertilizer – : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये बदल करून ठिबक सिंचन याच्यासाठी दिले जाणारे अनुदान कमी करून रासायनिक खत व सेंद्रिय खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. याच्यासाठी राज्य सरकारने 21 सप्टेंबर 2023 रोजी जीआर काढलेला आहे.

शासन निर्णय

 • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-24 पासून राबवण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता मिळणे बाबत
 • या योजनेचे अंतर्गत सन 2023-24 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ठिबक सिंचन द्वारे पाणी देणे. या बाबी ऐवजी रासायनिक व सेंद्रिय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
 • या योजनेअंतर्गत शासन अनुदानित बाबींच्या प्रति हेक्टरी सुधारित मापदंड मंजुरी देण्यात येत आहे.
 • जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसून आल्यास लाभार्थ्यांना देय असणारे अनुदान तीन वर्षात 50:30:20 याप्रमाणे अनुदान मिळेल.

कलमे लागवडीसाठी दिले जाणारे अनुदान

 • झाडांची संख्या, मजुरी , लागणारी सामग्री याच्या अंतर्गतच लागणाऱ्या रासायनिक तसेच सेंद्रिय खताचा समावेश करण्यात आलेला आहे.
 • आंबा कलमे , काजू कलमे ,पेरू कलमे, डाळिंब कलमे ,कागदी लिंबू कलमे ,संत्रा मोसंबी कलमे, सीताफळ कलमे, आवळा कलमे, चिंचकलमे, जांभूळ कलमे, कोकम कलमे ,फणस कलमे, अंजीर कलमे ,फणस कलमे ,चिकू कलमे, नारळ रोप बनवणे अशा सर्व फळबाग पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
 • या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान
 • या योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान
 • या योजनेअंतर्गत तिसऱ्या वर्षी 20 टक्के अनुदान
  असे मिळून तीन वर्षाचे शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे.

उदाहरणार्थ

आंबा फळबाग लागवडीच्या खर्च

 • आंबा फळ लागवड करण्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे, नांग्या भरणे, खत देणे याच्यामध्ये मजुरीचा खर्च ( सामग्री म्हणजे खत देणे आणि मजुरी)
 • आंबा लागवडीकरिता प्रति हेक्टर 6430 रुपये पहिल्या वर्षासाठी दिले जाणारे अनुदान आहे
 • दुसऱ्या वर्षासाठी दिले जाणारे अनुदान 8895 रुपये
 • तिसऱ्या वर्षी दिले जाणारे अनुदान 10856 रुपये
  असे तीन वर्षाचे एकूण 26,181 एवढे अनुदान दिले जाणार आहे.

आंबा फळबाग लागवडीच्या संदर्भातील एक इस्टिमेट मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितले आहे. अशाच प्रकारे सर्व वरील सांगितलेल्या फळांपैकी ज्या फळांची तुम्हाला लागवड करायची आहे. त्यानुसार तुम्हाला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी ,तिसऱ्या वर्षी असे अनुदान दिले जाईल. ते अनुदान फळ निवडण्यावर आहे हे लक्षात घ्यावे. Subsidy for fertilizer

Subsidy for fertilizer

Subsidy for fertilizer – : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत अंतर्गत विविध प्रकारच्या फळपिकांना प्रतिहेक्टरी अनुदान दिले जाणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी व हे अनुदान प्रत्येक फळबाग लागवडीच्या नुसार वेगवेगळे आहे. याचे देखील नोंद घ्यावी. अशाच नवीन माहितीसाठी भागीरथी गोल्ड या वेबसाईटला भेट देत रहा.धन्यवाद

Leave a comment

error: