Shabari Gharkul Yojana 2023 | शबरी घरकुल योजना | Best scheme in maharashtra

शबरी घरकुल योजना ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून 2013 पासून सुरू करण्यात आले आहे.

Shabari Gharkul Yojana 2023 : शबरी घरकुल आवास योजना या योजनेचा अधिकृत अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यासोबत लाभार्थ्याने सादर करावयाची कागदपत्र याची यादी तसेच इतर काही महत्त्वाचे लागणारे कागदे याचे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या वतीने याच्या संदर्भातील जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अर्जाचा नमुना

Shabari Gharkul Yojana 2023

आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जाचा नमुना

या अर्जा मध्ये अर्जदाराचा फोटो लावायचा आहे.
प्रति,
प्रकल्पअधिकारी एकात्मिक आदिवासीविकास प्रकल्प –
विषय – : घरकुल मिळणेबाबत

 • अर्जदाराचे संपूर्ण नाव
 • संपूर्ण पत्ता
 • आधार क्रमांक
 • शिधापत्रिका क्रमांक
 • बँक खाते तपशील
 • बँकेचे नाव व खाते क्रमांक
 • जन्म दिनांक
 • वय
 • जमात
 • लिंग
 • विवाहित /अविवाहित
 • विवाहित असल्यास अपत्य संख्या – : मुले /मुली एकूण
 • कुटुंबातील व्यक्तींची संख्या – : महिला /पुरुष एकूण
 • योजनेचे नाव /मागणी –
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न –
 • उत्पन्नाचे साधन – : शेती /व्यवसाय
 • स्वतःच्या मालकीची जागा आहे का? होय/ नाही
 • अर्जदार पुढीलपैकी आहे काय – : भूमिहीन, विधवा, परित्यक्त्या ,दिव्यांग नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेले, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडीत झालेल्या अनुसूचित जमातीच्या पात्र व्यक्ती, प्रकल्पग्रस्त

Shabari Gharkul Yojana 2023 – : प्रकल्प कार्यालयामार्फत अथवा इतर विभागामार्फत यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे काय ?असल्यास ,कोणत्या योजनेचा
त्याची सविस्तर माहिती योजनेचे नाव कोणत्या वर्षी लाभ घेतला हे सर्व व्यवस्थित माहिती भरायचे आहे.( कुठल्याही प्रकारच्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी)

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे

 • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जमातीचे प्रमाणपत्र
 • सातबारा उतारा किंवा नमुना आठ अ (घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी) जागा नसेल तर नाही दिला तरी चालतो.
 • उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा
 • ग्रामसभेचा ठराव
 • शिधापत्रिका
 • आधार कार्ड
 • एक रद्द केलेला धनादेश म्हणजे कॅन्सल चेक

वरील प्रमाणे मागणी केलेली सर्व कागदपत्रे जोडावीत ज्या व्यक्तीकडे स्वतःची जागा नाही त्याने दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत अर्ज करावा त्याद्वारे त्याला जागा घेण्यासाठी शासनातर्फे अनुदान मिळते याची जागा नसणाऱ्या व्यक्तींनी नोंद घ्यावी.

टीप – :

अर्जाचा नमुना झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध नसेल तरीदेखील तुम्ही आत्ता सांगितलेल्या अर्जाचा नमुन्यासारखा घरी नमुना एका कागदावर तयार करून अर्ज केला तरी तो अर्ज शासनाने स्वीकारण्यास सांगितलेला आहे. धन्यवाद

Shabari Gharkul Yojana 2023

Leave a comment

error: