Rabi Seed Subsidy Scheme | रब्बी बियाणे अनुदान योजना

Rabi Seed Subsidy Scheme – : राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 करिता अनुदानावरील बियाण्यांचे वाटपाचे महाडीबीटी फार्मर योजनेच्या माध्यमातून अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. हे अनुदान कसे मिळवायचे हे बियाणे अनुदान मिळण्यासाठी कसा अर्ज केला जातो. त्याचीच आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Rabi Seed Subsidy Scheme – : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामासाठी बियाण्यांचे वाटप केले जाते.

खालील दोन प्रकारांमध्ये बियाण्यांची अर्ज स्वीकारले जातात.

1) पीक प्रात्यक्षिक
2) प्रामाणित बियाण्यांचे वितरण

ऑनलाइन पद्धतीने अर्ज खालील प्रमाणे करावा.

Mahadbt.login farmer सर्च करा.

आता या पोर्टल वर आल्यानंतर तुम्ही सुरुवातीला लॉगिन करून घ्या.

अर्ज येथे लॉगिन करा.( लॉगिन प्रकार निवडा)

1) वापर करता आयडी
2) आधार क्रमांक ( आपण या ठिकाणी आधार क्रमांक हे ऑप्शन निवडून या)
आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाकून घ्या.( तुम्ही जर सुरुवातीलाच अर्ज करत असाल तर त्या ठिकाणी दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच सर्व प्रोसेस करा)

त्याच्याबरोबर खाली असलेला कॅपच्या कोड जशास तसे टाकून घ्या.

लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रोफाइल पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे.

 • पिकाची माहिती – : रब्बी पिकाची माहिती जोडलेली आवश्यक आहे
 • जमिनीची माहिती – : याच्यामध्ये जमिनी संबंधातील जी कागदपत्रे असतात ती जोडलेली आवश्यक आहे.
 • क्षेत्राची देखील माहिती अशी संपूर्ण माहिती भरून घ्या. 100% प्रोफाइल भरल्यानंतर पुढे

रब्बी बियाणे अनुदान योजना

अर्ज करा याच्यावर क्लिक करा.

पुढील पेजवर तुम्हाला – कृषी यांत्रिकीकरण ,सिंचन साधने व सुविधा ,बियाणे औषधे व खते ,फलोत्पादन या बाबी दिसतील.

बियाणे औषध व खते – : बियाणे औषध व खते या बाबी समोरील “बाबी निवडा” याच्यावर क्लिक करायचे आहे.

आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
त्यामध्ये

 • तालुका – : तुमचा तालुका निवडा
 • गाव/शहर – : तुमचे गाव निवडा
 • सर्वे नंबर/गट क्रमांक – : सर्वे नंबर निवडून घ्या.
 • मुख्य घटक – :
 • बाब निवडा – : बियाणे
 • पीक निवडा -: ज्वारी, भुईमूग, हरभरा, गहू, जवस, करडई इत्यादी( याच्या मधून एकची निवड करा)
 • अनुदान हवे असलेली बाब – प्रामाणित बियाणे वितरण
 • बियांचा प्रकार – उच्च उत्पादन क्षम बियाणे
 • खत निवडा – :
 • वान निवडा (जुने वान/नवीन वाण) – : नवीन वान
 • वाण – : या वाणामध्ये ह्या ज्वारिटी आहे त्यांची नावं दिसतील त्याच्या मधील एका वाणाची निवड करा.
 • एकूण क्षेत्र (हेक्टर आणि आर मध्ये) – : एक एकर ,दीड एकर, दोन एकर जे तुमचे क्षेत्र आहे ते निवडा.
 • क्षेत्र (हेक्टर) – : या ठिकाणी तुम्ही तुमचे क्षेत्र निवडा.
 • अंदाजीत आवश्यक बियाणे (किलो प्रमाणे) – : तुमच्या क्षेत्रांनी चार त्या ठिकाणी अंदाजे किलो प्रमाणे बियाणे येईल.

आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपणास सदर पिकाचे अन्यवान उपलब्ध करून दिले जाईल. √ (याला राईट अशी टिक करा)

जतन करा याच्यावर क्लिक करा.

जतन करा याच्यावर क्लिक केल्यानंतर
आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत का ? असं प्रश्न विचारण्यात येईल.
निवडायचे असेल तर Yes करा.
नसेल पाहिजे तर No याच्यावर क्लिक करा.

अर्ज सादर करण्यासाठी परत एकदा होम पेज वर यायचे आहे.

 • स्क्रीनवर उजव्या बाजूला “अर्ज सादर करा” असे लिहिलेले आहे. त्याच्यावर क्लिक करा.

तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल.
( आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडायची खातरजमा करा. अर्जात आणखीन काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेनू बार वर जा या बटणावर क्लिक करा अन्यथा अर्ज सादर करा. या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा) याला ‘ok’ करा.
आणि पुढे ‘पहा’ याच्यावर क्लिक करा.

Rabi Seed Subsidy Scheme – : पहा याच्यावरती केल्यानंतर आपण ज्या ज्या बाबी ची निवड केली आहे. त्या सर्व बाबी तुम्हाला तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतील त्या व्यवस्थित वाचून घ्या. व त्याला प्राधान्य क्रमांक द्या.

योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. √ (राईट करून घ्या)

त्याच्याखाली ग्रीन कलर मध्ये असलेल्या ‘अर्ज सादर करा’ या बटणावर क्लिक करा.( आपले पेमेंट झालेले आहे. त्यामुळे आपला अर्ज आता सादर झालेला आहे) Rabi Seed Subsidy Scheme

आता परत होम पेजवर या.

 • मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावर क्लिक करा.
 • छाननी अंतर्गत अर्ज याच्यावर क्लिक करा. आता आपला अर्ज या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आपल्याला एलिजिबल फॉर लॉटरी असं त्या ठिकाणी दिसेल. ज्यावेळेस तुमच्या लॉटरी लागेल त्या ठिकाणी तुम्हाला विनर असे दाखवल्या जाईल.

अत्यंत महत्त्वाचे – :

 • बऱ्याचश्या शेतकऱ्यांना विनर म्हणून दाखवले तरी एसएमएस पाठवले जातात.
 • एसएमएस प्राप्त झाल्यानंतर तुमच्या असलेल्या कृषी सहाय्यकाकडून टोकन घ्यावे लागते.
 • आपल्या खरेदी केलेल्या बियाण्याची जी काही किंमत असेल त्यामधून अनुदानाची किंमत वजा केली जाते.
 • आपल्याला त्या बियाण्याची तेवढी किंमत धरून ते बियाणे दिले जाते.

उदाहरणार्थ – :

 • एखाद्या बियाण्याची किंमत दोन हजार रुपये असेल जर त्या बियाण्यांच्या अनुदानाची किंमत सातशे रुपये असेल तर तुम्ही ते टोकन देऊन त्या ठिकाणी सातशे रुपये अनुदानाचे जमा होतील व उर्वरित रक्कम ही तुम्हाला द्यावी लागेल.

टीप – : तुम्ही जर या वर्षात एक वेळा पण बियाण्यांसाठी अर्ज केलेला नसेल. तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसे एवढी रक्कम अनुदानित बियाण्यासाठी भरावी लागेल. अन्यथा तुम्ही कुठल्याही प्रकारचे पेमेंट न करता अर्ज करू शकता.

Rabi Seed Subsidy Scheme

Rabi Seed Subsidy Scheme – : वरती दिलेल्या सविस्तर माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्हाला स्वतःला अर्ज करता येत नसेल तर जवळ असलेल्या सीएससी केंद्रावर जाऊन अर्ज करा धन्यवाद.

Rabi Seed Subsidy Scheme – : ” शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती घेण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.”

Leave a comment

error: