Pola Festival | बैलपोळा विशेष लेख

पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलाचा सण आहे. आपल्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य दिव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्यप्रदेश व तेलंगणा या राज्यातील सीमा भागात सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पोळ्या सणाची थोडक्यात सविस्तर माहिती पाहूया

पोळा हा सण का साजरा केला जातो ?

  • पोळा हा सण विशेषतः महाराष्ट्र आणि थोड्याफार प्रमाणात सर्व भारतभर साजरा केला जातो. पोळा सणा दिवशी बैलांना शेतातील योगदानाबद्दल कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो.

पोळा या सणाचे महत्त्व काय ?

  • Pola Festival बदलत्या कृषी क्षेत्रातील धोरणानुसार मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले आहे असे झाले असले तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या सर्जा राजा प्रति (बैला प्रति) कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो.

बैलपोळा हा सण कधी साजरा केला जातो ?

  • बैलपोळा हा सण दरवर्षी श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी बैलपोळा 14 सप्टेंबर 2023 या दिवशी आहे.

छोटा पोळा म्हणजे काय ?

  • बैलपोळा ह्या दिवशी बैल यांना आराम देऊन त्यांची पूजा केली जाते त्यांच्याविषयी कृतज्ञ व्यक्ती केली जाते. तर छोटा पोळा म्हणजे लहान मुले खेळण्याचे बैल घरोघरी घेऊन जातात आणि रोख किंवा काही भेटवस्तू त्यांना मिळतात याला छोटा पोळा असे म्हणतात.Pola Festival

Pola Festival 2023

Pola Festival – : बैल पोळा या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो ते आपल्या बैलांना पोळ्याच्या आदल्या दिवशी आमंत्रण देतात. या दिवशी त्यांना नदीवर ओढ्यावर नेऊन अंघोळ घालतात तसेच या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात त्यालाच खांदे मळणे ,खांड शेकणे असे म्हणतात. बैलांच्या सर्व अंगावर गेरूचे ठिपके, शिंगाना बेगड डोक्याला बाशिंग नवा कासरा पायात चांदीचे वा करदोऱ्याचे तोडे घालतात. तसेच बैलांना खायला पुरणपोळी किंवा सुग्रास असा नैवेद्य देतात जर बैलाची निगराणी करणारा गडी असेल तर त्याला बैल करी म्हणजे घरघड्यास नवीन कपडे देतात.

Pola Festival – : या सणासाठी आपला बैल उठून दिसावा यासाठी आपल्या आपल्या ऐपतींप्रमाणे बैलांचा साज शृंगार खरेदी करतात. बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावच्या वेशीला किंवा मंदिराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात. तसेच प्रत्यक्ष शेतकरी स्वतःच्या घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधतो. प्रत्येक शेतकरी आपल्या बैल जोड्या घेऊन वाजंत्री सनई ढोल ताशे असं सर्व वाजवत गावातील मानाचे असणारे जमीनदार पाटील यांच्याकडून ते बांधलेले तोरण तोडले जाते यालाच पोळा फुटला (पोळा फुटतो )असे म्हणतात.

आता सर्व बैल मारुती मंदिराच्या देवळात घेऊन जातात त्याच्यानंतर आपापली बैल आपापल्या घरी घेऊन जातात त्यांना ओवाळतात व नैवेद्यते देतात अशा प्रकारे बैलपौळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.Pola Festival

Leave a comment

error: