PM Vishwakarma Scheme | विश्वकर्मा योजना

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पीएम विश्वकर्मा योजना नेमकी आहे काय ? तिचा नेमका लाभ कोणाला होणार आहे
या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया

PM विश्वकर्मा योजना ही योजना 17 सप्टेंबर 2023 या दिवशी सुरू करण्यात आली आहे. या दिवशी भगवान विश्वकर्मा यांचीजयंती आहे . या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

PM Vishwakarma Scheme – : पंतप्रधान विश्वकर्मा योजना 16 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी तेरा हजार कोटी(13000) रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना 2023 -2024 ते 2027 – 2028 या पाच वर्षासाठी ही योजना राबवली जाणार आहे. Www. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची माहिती PMVishwakarma.gov.in या वेबसाईटवर सविस्तर दिलेली आहे.

विश्वकर्मा योजनेचे फायदे

 • या योजनेद्वारे कारागिरांना आणि हस्तकला कामगारांना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळेल.
 • या योजनेअंतर्गत प्रमाणपत्र ओळखपत्र पात्र असणाऱ्या व्यक्तींना पहिल्या टप्प्यात एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
 • तसेच दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये पाच टक्के व्याजासह कर्ज दिले जाईल.
 • संपूर्ण भारतभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागिरांना या योजनेमध्ये सामावून घेतले जाईल.
 • सुरुवातीला 18 पारंपरिक पारंपारिक व्यवसाय यांचा समावेश केला जाईल व त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.

कोणाला या योजनेचा लाभ होणार ?

सुतार
सोनार
कुंभार
शिल्पकार
मूर्तिकार
चांभार
गवंडी
विणकर – : चटई
झाडू बनवणारे
दौऱ्या वळणारे
बेलदार
पारंपरिक खेळणी बनवणारे
नाभिक
हारतुरे तयार करणारे
धोबी
शिंपी
मासेमारीचे जाळे बनवणारे
होड्या बांधणारे
चिलखत तयार करणारे
लोहार
कुलूप तयार करणारे
कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार तयार करणारे इत्यादी लोकांचा सुरुवातीला समावेश केला जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात

PM Vishwakarma Scheme – : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना मूलभूत प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण असे दोन टप्प्यात प्रशिक्षण दिले जातील प्रशिक्षणार्थींना दररोज पाचशे रुपये(500) आर्थिक मदत दिली जाईल तसेच औद्योगिक उपकरणे खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये(15000) आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील माहिती वाचावी

चार पातळ्यांवर नोंदणी करण्याची आवश्यकता आहे.

 • 1) मोबाईल आणि आधार पडताळणी( या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कारागिरांना मोबाईल ऑथेंटिक केशन आणि आधार ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे)
 • 2) रजिस्ट्रेशन फार्म ( रजिस्ट्रेशन फॉर्म भरून या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थे च्या सामायिक सेवा केंद्र द्वारे तसेच ऑनलाईन पोर्टल द्वारे अर्ज करता येतील)
 • 3) पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र ( अर्जदार कारागिरांना पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र व डिजिटल ओळखपत्र डाऊनलोड करावे.)
 • 4) कौशल्यानुसार योजनेसाठी अर्ज करणे ( कारागिरांनी आपापल्या व्यवसायानुसार अर्ज करणे आवश्यक आहे.)

अर्जांची पडताळणी करण्यासाठी तीन पातळीवरील पडताळणी करावी लागते. ही पडताळणी झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया यशस्वी होईल.

PM Vishwakarma Scheme – : या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी पाच लाख लोकांना लाभ देण्यात येणार आहे. पाच वर्ष े मध्ये एकूण 30 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

PM Vishwakarma Scheme – : पारंपारिक कौशल्य असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना घेऊन येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची पुढील उद्दिष्टे

 • गुरु शिष्य परंपरेला चालना देनं
 • कारागीरांच्या कुटुंबिक आधारित पारंपारिक व्यवसायाला वेळ देणे त्यांना कर उपलब्ध करून देणे.
 • कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारण्यावर काम करणे.
 • कारागीर ना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे म्हणजे त्यांना देशांतर्गत व देशाबाहेर त्यांचा व्यवसाय नेण्यासाठी मार्गदर्शन करणे.PM Vishwakarma Scheme

Leave a comment

error: