PM Kisan | Best Farmer Scheme 2023

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना याच्याबद्दल नवीन अपडेट आले आहे त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.

PM Kisan सन्मान निधी योजने च्या लाभार्थ्यांना पात्रतेसाठी पुढील बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत.

  • E – KYC करणे बंधनकारक आहे.
  • लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याच्या खात्याला आधार शेडिंग असणे गरजेचे आहे.
  • बऱ्याचश्या लाभार्थ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये नाव आलेले आहेत. त्या सर्व लाभार्थ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे.

मागील काही दिवसापासून निधी वितरित करीत असताना काही अटी शिथिल करून निधीचे वितरण केले जात होते. परंतु राज्यातील लाखो लाभार्थी E – KYC केलेली नाही. अशा सर्व लाभार्थ्यांना ही शेवटची संधी आहे ज्यांचे ई केवायसी करणे राहिले आहे त्या सर्वांनी E – KYC करून घ्या.

  • E – KYC करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. PM Kisan सन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत अशा सर्वांनी लवकरात लवकर E – KYC करणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.( अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाकडून, राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे )

जे लाभार्थी 20 सप्टेंबर 2023 पर्यंत E – KYC करणार नाहीत. आधार प्रामाणिकरण करणार नाहीत तसेच ज्या लाभार्थ्यांना फिजिकल वेरिफिकेशन करण्यास सांगितले आहे. अशांनी जर फिजिकल ची सर्व कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर अशा सर्व लाभार्थ्यांचे 30 सप्टेंबर 2023 नंतर या योजनेमधून नाव कमी करण्यात येईल. म्हणजे हे सर्व लाभार्थी शेतकरी एकूण (12000) बारा हजार रुपयांच्या लाभाला मुकणार आहेत.

सर्वांच्या माहिती करिता PM Kisan योजनेचे लाभार्थी हे सर्व CM Kisan योजनेला ( नमो शेतकरी योजना ) म्हणजे या दोन्ही योजनेमध्ये या शेतकऱ्यांचा समावेश होणार नाही. या योजनेला सर्व लाभार्थी मुकणार आहेत.

PM Kisan योजनेत जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांची CM Kisan ( नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ) याच्यासाठी निवड केली जाणार आहे म्हणजे PM Kisan योजनेची यादी हीच नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेसाठी पात्र केले जाणार आहे. म्हणजे सर्वांना हप्ता देण्यासाठी वापरली जाणार आहे या दोन्ही योजनेची यादी एकच असणार आहे. जय शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे म्हणजे एकूण बारा हजार रुपये सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

20 सप्टेंबर 2023 पर्यंत पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी E – Kyc करणे आवश्यक आहे.

PM Kisan

साधारणपणे 30 सप्टेंबर नंतर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील सर्व सांगितलेली माहिती व सर्व कागदपत्रांची पूर्तता व्हेरिफिकेशन तसेच E – Kyc लवकरात लवकर करून घ्यावी धन्यवाद.

Leave a comment

error: