PM KISAN YOJANA NEW UPDATE | PM किसान न्यू अपडेट 2023

PM KISAN YOJANA NEW UPDATE – : पी एम किसान योजना केंद्र सरकारची महत्त्वकांक्षा योजना आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार तर्फे शेतकऱ्यांना एका वर्षाचे सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्याच्या( दोन-दोन हजार) स्वरूपात दिले जातात.

PM KISAN YOJANA NEW UPDATE – : पी एम किसान योजनेचा लाभ घेताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात. अशा येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने AI CHATBOT ( AI System) वेबसाईटच्या मध्ये ऍड केलेला आहे. त्या ऍड केलेल्या चॅटबोट द्वारे पी एम किसान सन्माननिधी योजने चा लाभ घेताना अडचणी येत असतील तर त्या याद्वारे दूर केल्या जातात. या नवीन ऍड केलेल्या चॅटबोट द्वारे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पैसा जमा होण्यास येणाऱ्या प्रत्येक अडचणी किंवा इतर अडचणी त्या कशा दूर केल्या जातील. ते मी तुम्हाला सांगतो. तसेच पुढील पैसा कधी जमा होणार आहे. त्याचे देखील माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पुढे देणार आहे.

PM Kisan.gov.in

सुरुवातीला PM Kisan.gov.in या ऑफिशियल साईडला ओपन करा.

 • साईट ओपन झाल्यावर स्क्रीनच्या उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन फार्मर, इ केवायसी याच्याबरोबर खाली
  Need to help याच्यावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर किसान E मित्र ( E -MITRA) हे पेज ओपन होईल. ( या चॅटबोटचा उपयोग करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला जी सोपी भाषा वाटल ती निवडायची आहे)

 • भाषा निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रश्न विचारा असे वाक्य दिसेल.( तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी दिलेल्या माइक वर क्लिक करून सुद्धा विचारू शकता किंवा तुमचा प्रश्न तुम्ही टाईप करून देखील विचारू शकता.)

प्रश्न कसा विचारावा त्याच्यासाठी काही खाली उदाहरणे दिलेली आहेत. 1) या योजनेचा मागील हप्ता मला मिळाला नाही ? 2) माझ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची स्थिती सांगा ? 3) माझ्या पीएम किसान सन्मान निधी च्या खात्यामध्ये काय अडचणी आहेत ? 4) या योजनेचा मी पात्र लाभार्थी का नाही ?

सुरवातीला आपण – :
प्रश्न – : पीएम सन्मान निधी योजनेचा मला पैसा का नाही मिळाला ? ( विचारलेला प्रश्न त्या ठिकाणी send करावा )
उत्तर – : प्रिय लाभार्थी तुमची माहिती मिळवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमची आधार क्रमांक किंवा पी एम किसान पंजीकरण नंबर किंवा मोबाईल नंबर टाका.

 • आपण या ठिकाणी आधार नंबर टाकून घेऊया.
  ( जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला अटॅच आहे त्याच्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी त्या ठिकाणी टाकून घ्या ) थोडा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो.
 • पुढे तुम्हाला तुमच्या आधारवरील सर्व माहिती म्हणजेच नाव, गाव ,पत्ता ,मोबाईल नंबर दिसेल.
 • या ठिकाणी मी माझा आधार क्रमांक टाकलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आयकर भरतात त्यामुळे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येणार नाही असे उत्तर आले.
  ( पी एम किसान योजनेच्या दिशा निर्देशानुसार तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही)

जर तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर खालील प्रमाणे करावे.

पुन्हा एकदा pm kisan .gov.in या साईटच्या होम पेजवर या

या साईटच्या होम पेजवर आल्यावर Know Your Status याच्यावर क्लिक करा.

 • त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. आणि क्लिक करा.
 • पुढील पेज मध्ये Eligibailty Status याच्यामध्ये Land Seeding √ Yes अशी असेल तरच पैसा मिळतो.
 • e – kyc Statusv √ yes
 • Addhar band Account seeding Status √ yes ही सर्व माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल.

Last Installment Details

आता आपण 14 वा हप्ता कधी जमा होणार याची माहिती पाहण्यासाठी लास्ट इंस्टॉलमेंट डिटेल्स याच्या समोरील रिकामी जागेमध्ये 14 हा आकडा टाकून सर्च करावे.

आपण आता 14 वा हप्ता कधी मिळणार हे सर्च केले होते त्याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर ,मोबाईल च्या स्क्रीनवर दिसेल.

PM KISAN YOJANA NEW UPDATE

PM KISAN YOJANA NEW UPDATE – : या पद्धतीने केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची सविस्तर माहिती पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही चॅटबोटच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रश्न विचारून उत्तरे घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 15 हप्ता कधी मिळणार तर केंद्र सरकारतर्फे ऑक्टोबर महिन्याच्या आत मध्ये दिले जाईल.

जर याच्या संदर्भात केंद्र सरकारतर्फे काही माहिती सांगण्यात आली तर ती माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद

Leave a comment

error: