फळपिक विमा

फळपिक विमा

शासन निर्णय -: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021- 22 मध्ये ₹ 24,94,288/- इतकी रक्कम वितरित करण्याबाबत.

फळ पिक विमा योजनेचा उर्वरित विमा वितरित करण्यासंदर्भात 7 ऑगस्ट 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

शेतकरी बंधूंनो राज्यामध्ये आंबिया बहार सन 2021- 22 मध्ये ही योजना राबविण्यात आली होती. ही योजना मोसंबी, संत्रा, काजू, डाळिंब ,आंबा ,केळी ,द्राक्ष ,स्ट्रॉबेरी ,पपई (आंबिया बहार) अशा एकूण नऊ फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात आली होती.

  1. click – > ई पीक पाहणी महत्त्व
  2. click -> डोळे येऊ नये याच्यासाठी मार्गदर्शक सूचना
  3. click -> लेक लाडकी योजना

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. फळपीक विमा याचे वाटप देखील करण्यात आले होते. परंतु बऱ्याचश्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा निधी वितरित न झाल्याचे कारण सांगून पिक विम्या पासून वंचित ठेवण्यात आले होते. याच्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून 23 जून 2023 रोजी निधीची मागणी करण्यात आली होती.

याच्या अंतर्गत एचडीएफसी ऍग्रो ,जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ,रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपन्या मार्फत दिला जातो. याच्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केलेला आहे.

फळ पिक विमा योजना आंबिया बहार सन 2021- 22 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेऊन राज्य हिस्सा अनुदाना पोटी ₹ 24,94,288/- एवढी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय-कृषी-विमाकंपनीस उपलब्ध करून देण्यास राज्यशासनाची मान्यता देण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या हिस्स्याचे अनुदान उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित पीक विमा वितरित करण्यासाठी मदत मिळणार आहे.

हा विमा साधारण 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान जे शेतकरी बंधू पात्र होतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a comment

error: