Pik vima 2023 |छत्रपती संभाजी नगर | Crop Insurance approved In Chhatrapati Sambhaji Nagar

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील सोयाबीन, कापूस ,मका या पिकांना 25% आग्रीम पिक विमा मंजूर आता पाहूया आपण सविस्तर माहिती

Pik vima 2023 – : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे व मागील 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% आग्रीम पिक विमा मंजूर केलेला आहे. हा पिक विमा एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

खालील प्रमाणे तालुक्याचे नाव व नुकसान झालेल्या महसूल मंडळाचे नाव

सोयाबीन पिकासाठी पिक विमा पात्र महसूल मंडळे व तालुके पुढील प्रमाणे

 • औरंगाबाद – : लाडसांगवी , चौका
 • वैजापूर – : शिवपुर, गरज , नागमठाणा, महालगाव , बाबतारा ,वैजापूर ,खंडाळा, जानेफळ घायगाव, बोरसर इत्यादी
 • गंगापूर – : मांजरी ,भेंडाळा , शेंदूरवाडा, सिद्धनाथ , वडगाव , गाजगाव इत्यादी

कापूस या पिकासाठी पिक विमा पात्र महसूल मंडळे व तालुके खालील प्रमाणे

 • औरंगाबाद – : लाडसांगवी ,चौका ,पिसादेवी, शेकटा
 • फुलंब्री – : पीरबावडा
 • वैजापूर – : शिवूर, गारज ,नागमठाणा ,महालगाव बाबतारा, वैजापूर, खंडाळा ,जानेफळ ,घायगाव, बोरसर इत्यादी
 • गंगापूर – : मांजरी ,भेंडाळा ,शेंदूरवाडा ,सिद्धनाथ, वडगाव, गाजगाव इत्यादी

मका या पिकासाठी पिक विमा पात्र महसूल मंडळे व तालुके खालील प्रमाणे

 • औरंगाबाद – : लाडसांगवी ,चौका ,पिसादेवी, शेकटा
 • फुलंब्री – : पीरबावडा
 • वैजापूर – : गारज, शिवूर, नागमठाणा ,महालगाव, बाबतारा, वैजापूर ,खंडाळा ,जानेफळ ,घायगाव, बोरसर इत्यादी
 • गंगापूर – : मांजरी ,बेंडाळा, शेंदूरवाडा, सिद्धनाथ वडगाव ,गाजगाव इत्यादी

वरील पात्र झालेल्या महसूल मंडळांना पिक विमा कंपनीच्या तरतुदीनुसार अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत उपरोक्त महसूल मंडळातील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य पीक विमा नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के आगाव रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी.
अंतिम पीक कापणीच्या अहवालानुसार नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल.

सोयाबीन, कापूस व मका या पिकांचा पिक विमा जमा करण्याचे आदेश चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे या कंपनीला जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी दिले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

Leave a comment

error: