Pest Attack Subsidy (CMV Disease)22,500

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार Pest Attack ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे. तसेच अतिवृष्टी,पूर व चक्रीवादळ , गोगलगाय, कुकुंबर मोझक वायरस याही रोगाचा समावेश करण्यात आलेला आहे.

वरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेती पिकांचे तसेच फळबागांचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होते. अशा झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने एन डी आर एफ या धोरणानुसार वरील बाबींचा समावेश केलेला आहे.

अशाप्रकारे नुकसान झाले तर खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळते

  • जिरायत क्षेत्रासाठी – : 8500 ₹ प्रति हेक्टर
  • बागेत क्षेत्रासाठी. – : 22500 ₹ प्रती हेक्टर ( फळबागा बहुवार्षिक पिक याच्यासाठी )

राज्यातील विविध भागांमध्ये सन 2022 मध्ये नैसर्गिक आपत्ती त्याच्यामध्ये सततचा पाऊस असणे.पूर परिस्थिती निर्माण होणे. अतिवृष्टी, गोगलगाय अशा विविध कारणाने पिकांचे नुकसान झाले होते.

जळगाव जिल्ह्यातील केळीच्या बागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. तसेच नव्याने लागण झालेल्या केळीच्या बागा मध्ये कुकुंबर मोजक नावाच्य व्हायरसने नुकसान झाले होते. याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ 275 गावातील 15,663 शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे कुकुंबर मोजाक व्हायरस रोगांच्या प्रादुर्भावामुळे एकूण 8,771 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Pest Attack Subsidy (CMV Disease) – : सन 2022 च्या पावसाळी हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यामधील कुकुंबर मोजाक व्हायरस (cmv) या रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी पिकाच्या नुकसानी करिता 22500 प्रति हेक्टर ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

असे एकूण रक्कम 19 कोटी 73 लाख रुपये एवढी रक्कम नुकसान भरपाई निधी वितरित करण्याकरिता मंजूर करण्यात आली आहे.

Pest Attack Subsidy (CMV Disease)

यापूर्वी अशा निर्माण झालेल्या समस्येचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळून उर्वरित राहिलेल्या लाभार्थ्यांना या रोगामुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून वरील रक्कम देण्यात येणार आहे.

Leave a comment

error: