Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

मुंबई महानगरपालिकेत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागा भरण्याबाबत माहिती दिली. महानगरपालिका अंतर्गत 42000 रिक्त जागा असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागा मुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिकेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नये. तसेच निवडणूक कामांची जबाबदारी इच्छुक व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. अशी मागणी मुंबई महानगरपालिकेकडे काही संघटनांच्या वतीने केली जात आहे.

मुख्यालयातील मुंबई महापालिकेचे कामकाज एकूण 24 वार्डातून चालते. तसेच, हे कामकाज पाहण्यासाठी एकूण एक लाख 40 हजार जागा असून त्यापैकी महापालिकेला सध्या हे कामकाज पाहण्यासाठी कायमस्वरूपी 98 हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

Mumbai Mahanagar Palika Bharti – : मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1100 लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येतील. तर 1700 लिपिक पदाच्या जागा लवकरच भरण्यात येणार असून ,त्याची जाहिरात येईल.असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मुंबई महानगरपालिके अंतर्गत अग्निशामन दलात 910 अग्निशामन दलाच्या जवानांची भरती होत असून त्यापैकी पाचशे सात जणांचे प्रशिक्षण अद्याप सुरू आहे तसेच यांच्या पुढील महिन्यात उर्वरित 450 जवानांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 – : मुंबई महानगरपालिका अंतर्गत 400 हून अधिक अभियंता पदाची भरती केली जाणार आहे. त्या प्रक्रियेसाठी एका खाजगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून मिळाली आहे.

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

मुंबई महानगरपालिका अंतर्गत लवकरच 42 हजार रिक्त जागांची भरती केली जाणार असून त्याच्या मधील पदे अभियंता, लिपिक, अग्निशामक दल जवान असे विविध पदांची भरती प्रक्रिया त्याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची सर्व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली आहे.

Leave a comment

error: