month of service | सेवा महिना

month of service – : सर्वसामान्य जनतेची कामे ठरवलेल्या कालावधीत व्हावी त्याकरिता राज्य शासनाने सन 2015 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले. या पोर्टलच्या माध्यमातून जनतेची कामे विविध काल मर्यादित पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु या पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या कामाचा शासनाने आढावा घेतला असता व मंत्रालय स्तरावर नागरिकाकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता संबंधित नागरिकांचे अर्ज तसेच तक्रारी यांचा दिलेल्या कालावधीत निपटारा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण होत नसल्याचे पाहून राज्य शासनाने दिनांक 17 सप्टेंबर 2023 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कालावधीत कोणती कामे होणार आहेत याची सविस्तर माहिती पाहूया.

month of service – : आपले सरकार सेवा पोर्टल ,माहिती वितरण पोर्टल, महाडीबीटी पोर्टल ,नागरी सेवा केंद्र ,सार्वजनिक तक्रार पोर्टल, विविध विभागांच्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्ज या सर्व कामांचा निपटारा करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाचे वतीने सेवा महिना राबवण्यात येत आहे.

जेव्हा महिन्यामध्ये खालील कामे करणे अपेक्षित आहे.

 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे.
 • प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे.
 • पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण
 • मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे.
 • नव्याने नळ जोडणी देणे.
 • मालमत्ता करायची आकारणी करणे व मागणी पत्र देणे.
 • प्रलंबित घरगुती विद्युत जोडणी मंजुरी देणे.
 • मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणी मध्ये नवीन मालमत्ता धारकाचे नाव नोंदणी करणे.
 • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे
 • अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. ज्या पट्ट्यात आपिल केली आहे असे सर्व वगळून
 • दिव्यांग प्रमाणपत्र देणे.
 • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देणे.
 • विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.
 • आधार कार्ड सुविधा पुरवणे.
 • पॅन कार्ड सुविधा देणे..
 • नवीन मतदार नोंदणी करणे.
 • जन्म मृत्यू नोंद घेणे व त्यांना प्रमाणपत्र देणे.
 • शिकाऊ चालक परवाना देणे.
 • बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणे.
 • महिलांसाठी सखी किटचे वाटप करणे.
 • महिला बचत गटास परवानगी देणे.
 • महिला बचतगटास प्राधान्याने रोजगारउपलब्ध करून देणे.
 • लसीकरणाचे आयोजन करणे.
 • ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे.
 • प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे.

month of service

month of service – : सेवा महिन्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडित असणाऱ्या महसूल विभाग ,ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागाकडील सेवा या पुरवणे व संबंधित विभागात प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करणे.

वरील सर्व कामे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याने करणे. तसेच सर्वसामान्य माणसांचे कामे व्हावे या उद्देशाने अधिक आकर्षक आणि नाविन्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये त्या त्या भागातील गरजा भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून आवश्यक ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

month of service – : प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार कार्यालयामध्ये हेल्प डे स्क किंवा हेल्पलाइन किंवा whatsapp द्वारे मदत करण्याकरिता यंत्रणा/ कक्ष तयार करून गरजू नागरिकांना मार्गदर्शन /शंकाचे निरसन तसेच आवश्यक ती व्यवस्था कार्यवाही करणे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे.

वरील सर्व विभागात आलेल्या तक्रारी किंवा अर्ज किंवा विविध विभागातील संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या तक्रारी या सर्वांचा निपटारा या सेवा महिना या महिन्यात करण्यात यावा या उद्देशाने दिनांक 17 सप्टेंबर 2023 ते दिनांक 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा महिना म्हणून राज्य शासन राबवण्यात निर्णय घेतलेला आहे.

month of service – : राज्यामध्ये गतवर्षी दिनांक 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवाडा म्हणून राबवण्यात आला होता. आता पण त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या वतीने विविध नागरिकांच्या तक्रारी अर्ज यांचा निप्तरा करण्यासाठी सेवा महिना राबविण्यात येत आहे.

Leave a comment

error: