MARATHA NEWS

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजाम कालीन पुरावे, वंशावळी ,शैक्षणिक पुरावे ,महसुली पुरावे ,निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी ,कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षते खाली समिती स्थापनेबाबत आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे.

शासन निर्णय

  • मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्याच्या वंशावळीचा उल्लेख कुणबी असा असेल तर अशा व्यक्तींच्या पुराव्याची काटेकोर तपासणी करून त्या सर्व व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाचे मान्यता देण्यात आली आहे.
    मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या कामामध्ये आवश्यकता अनिवार्य सर्व पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी

माननीय निवृत्त न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यात आली आहे.

1) माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे – > अध्यक्ष
2) खूप प्रमुख सचिव(महसूल), महसूल व वन विभाग – > सदस्य
3) प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग – > सदस्य
4) संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी – > सदस्य
5) विभागीय आयुक्त,औरंगाबाद विभाग – > सदस्य सचिव

तसेच इतर प्रशासकीय विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना आवश्यकतेनुसार बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

MARATHA NEWS

समितीची कार्य कक्षा पुढीलप्रमाणे राहील

  • मराठवाडा विभागातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा -कुणबी, कुणबी -मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकरण यांच्याकडे जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन स्थानिकांनी दिलेल्या संधी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंतिम मराठा -कुणबी ,कुणबी -मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करणे.

समितीचा कार्यकाळ

MARATHA NEWS – : या समितीचा कार्यकाळ हा एका महिन्याचा राहील. कारण राज्य शासनाने एका महिन्याच्या आत सर्व अहवाल दाखल करण्यास सांगितले आहे.

तरी राज्य शासनाच्या वतीने आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत हा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे धन्यवाद

Leave a comment

error: