Maharashtra Rain Update | पाऊस

राज्यातील मराठवाडा, कोकण ,मुंबई विदर्भ अशा सर्व भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झाल्या मुळे राज्यातील बळीराजा सुखावला आहे.

मराठवाडा –


 • मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळत आहे. तसेच यांच्या दोन ते दोन ते तीन दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड ,उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra Rain Update – : वरून राजाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गात खुशीचे वातावरण आहे. आता विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. पाऊस पडत असल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Rain Update

मुंबई


 • तसेच, मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यानंतर आता मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
 • कोकण – :
  हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणातील सिंधुदुर्ग ,रायगड ,रत्नागिरी ,पालघर, ठाणे आणि घाट मात्यावरील तुरळक ठिकाणी दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र – :
  महाराष्ट्रातील नाशिक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ,जालना, बुलढाणा, बीड ,उस्मानाबाद हिंगोली, गोंदिया, नागपूर ,भंडारा ,यवतमाळ, धुळे या काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 • खरीप – :
  खरीप हंगामातील पिकांना पाण्याची खूप आवश्यकता असल्याकारणाने पाऊस पडणे खूप गरजेचे झाले आहे. वरून राजाकडे डोळे लावून पाहणाऱ्या बळीराजाला या पावसाच्या अंदाजामुळे दिलासा मिळाला आहे.

Leave a comment

error: