MAHA DBT Scheme For SC,ST 2023

MAHA DBT Scheme For SC,ST – : महाडीबीटी फार्मर किमच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्कीम राज्य शासनामार्फत राबविल्या जातात. अशा स्कीमचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यास सुरू झाली आहे.

MAHA DBT Scheme For SC,ST – : केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी योजना राबवल्या जातात. त्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन योजना , राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अशा योजनांच्या माध्यमातून विविध प्रकारचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतो.

याच्या अंतर्गत जुनी विहीर दुरुस्त करण्याचे असेल किंवा नवीन विहीर करण्याचे काम असेल तसेच ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन , फळबाग लागवड असेल, शेततळ्यांची निर्मिती असेल, शेततळे करण्यासाठी दिले जाणारा खर्च असेल. या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या बाबीचा समावेश होतो. आणखीन सांगायचे झाल्यास तर यांत्रिकीकरणातील विविध प्रकारच्या यंत्र खरेदीसाठी या योजनेचा लाभ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.

MAHA DBT Scheme For SC,ST – : शासनामार्फत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच या लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य योजना देखील राबवल्या जातात.

या सर्व योजनेमध्ये भाग घेण्यासाठी महाडीबीटीच्या फार्मर्स पोर्टल स्कीमच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला जातो.

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज करण्यासाठी आपले सरकार महाडीबीटी या पोर्टल वरती लॉगिन करायचे आहे.
  • यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा आधार कार्ड याच्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांक वर आलेला ओटीपी टाकून. किंवा बायोमेट्रिकने लॉग इन करू शकता.
  • प्रोफाइल स्थिती – : जातीचा तपशील जोडावा त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्ग निवडावा. या ठिकाणी भरावयाची सर्व माहिती व्यवस्थित पूर्णपणे भरून घ्या. सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर तुमच्या असलेल्या जमिनीची तसेच सिंचनाच्या स्रोतांची माहिती तसेच इतर काही जी माहिती भरणे आवश्यक आहे. ती सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज करा याच्यावर क्लिक करा.

अर्ज करा याच्यावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पुढील पेज मधून कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, एकात्मिक फलोत्पादन याच्याच खाली बरोबर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हे दिलेले आहे. त्याच्यावर क्लिक करा.

पुढील पेज वरती तुम्हाला नवीन विहीरचे बांधकाम, जुन्या विहिरीची दुरुस्ती, स्वयंचलित पंप त्याच्यामध्ये सोलर पंप किंवा विजेची जोडणी , ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच, शेतातील तलावाचे प्लास्टिक अस्तर अशा विविध बाबी या ठिकाणी तुम्हाला दिसतील.

MAHA DBT Scheme For SC,ST

सिंचन साधनाच्या बाबी या सिंचन साधन या ऑप्शन मधून निवडू शकता.

अनुसूचित जाती जमाती मध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच घेण्यासाठी 90% अनुदान दिले जाते. याच्यामध्ये

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती च्या लाभार्थ्यांना उर्वरित पूरक अनुदान दिले जाते.

MAHA DBT Scheme For SC,ST – : अशाच प्रकारच्या सर्व योजना (RKVY) राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत किंवा एकात्मिक फलोत्पादन योजना या योजनेअंतर्गत फळबागांच्या लागवडी असतील तसेच त्यासाठी लागणारे यांत्रिकीकरण कलमे तसेच इतर साहित्य या सर्व बाबींचा लाभ देण्यासाठी कृषी विभागातर्फे ही मोहीम चालवली जात आहे.

शासनाच्या वतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

तरी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले सरकार महाडीबीटी पोर्टल या पोर्टल वर जाऊन अर्ज करावा. धन्यवाद MAHA DBT Scheme For SC,ST

Leave a comment

error: