Kusum Solar Scheme

कुसुम सोलार पंप योजनेत भरलेल्या अर्जांना आता हा ऑप्शन येत आहे. परत कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनमध्ये.

Kusum Solar Scheme – : मे महिन्यापासून कुसुम सोलर पंप योजनेसाठी महाऊर्जाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर अर्ज स्वीकारणे सुरू झाले होते. आणि या योजनेत इच्छुक शेतकऱ्यांकडून या पोर्टलवर अर्ज सादर करण्यात आले होते.

या योजनेत महा ऊर्जा पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सातबारा वर विहीर बोर याची नोंद असणे आवश्यक होते. तसेच सामायिक क्षेत्र किंवा पाण्याचे स्रोत असले अशा इतर खातेदारांचे ना हरकत अपलोड करणे आवश्यक होते. परंतु काही शेतकरी बांधवांनी महा ऊर्जा पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी कमी वेळ आणि कोटा संपण्याच्या भीतीपोटी अर्ज हे इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड न करताच सादर केला.

Kusum Solar Scheme या योजनेत सादर केलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनी अर्ज सादर केलेल्या क्रमाने अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बंधूंनी विहीर बोरवेल याची नोंद नसलेले सातबारा उतारा, सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत अपलोड केलेले नाही.

अशा शेतकऱ्यांना त्यांच्या त्रुटी बाबत त्यांनी अर्ज सादर करताना नोंदवलेल्या मोबाईल वरती संदेश पाठवण्यात येत आहेत. तसेच त्यांना या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना संदेशात पाठवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना तुरटी पूर्ण करण्याबाबतित चा संदेश आला असेल किंवा नसेल अशा सर्वांनी त्रुटी पूर्ण करण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर लॉगिन करावयाचे आहे व जी काही आवश्यक कागद पत्रे पुन्हा अपलोड करून सबमिट करणे आवश्यक आहे.

फॉर्म भरताना झालेल्या सर्वसाधारण चुका खालील प्रमाणे.
1) विहीर बोर याची नोंद नसलेले सातबारा उतारा
2) सामायिक क्षेत्र ,पाण्याच्या स्रोत बाबत इतर खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र

शेतकरी बंधूंनो तुमच्या लॉगिन मध्ये Reupload Document असा ऑप्शन आला असेल तर आपण त्यावरती क्लिक करून पीडीएफ फाईल मध्ये खालील कागदपत्रे अपलोड करावीत.

1) आधार कार्ड
2) पासपोर्ट फोटो
3) बँक खाते पासबुक
4) सातबारा उतारा

सर्वसाधारणपणे वरील कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात संदेश पाठवण्यात आलेले आहेत तरीही सर्व कागदपत्रे पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करून सबमिट करावे धन्यवाद.

Leave a comment

error: