कुसुम सोलार पंप योजना

कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या वतीने राज्यामध्ये खूप सारे अर्ज करण्यात आलेले आहेत. परंतु, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सिंचनाचे साधन म्हणून 7/12वर ” बोरवेलची ” नोंद केलेली आहे.

कुसुम सोलार पंप योजना – ; जे शेतकरी बोरवेलवर कुसुम सोलर पंप बसू इच्छित आहेत. अशा शेतकऱ्यांना पेमेंट चे मेसेज आलेले आहेत. त्यांचे सेल्फ सर्वे झालेले आहेत. जॉईंट सर्वे झालेले आहेत. हे सर्व झाल्यानंतर बोरवेल जर 210 फुटांपेक्षा जास्त खोल असेल तर अशा शेतकऱ्याचा सोलर पंप कंपनीच्या माध्यमातून पंप लवकर लावल्या जात नाही.

याच्यासाठी मागितला जातो ” शंभर रुपयाचा एक बाँण्ड “

तुमचा बोरवेल 210 फुटा पेक्षा जास्त खोल असेल, तर अशा शेतकऱ्यांनी कडुन शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून घेतले जाते.

कुसुम सोलार पंप योजना

पुढील, #प्रमाणे संमती पत्र लिहावे#

तुम्हाला ,
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागीय महाव्यवस्थापक (तुमचा जो विभाग असेल तो विभाग त्या ठिकाणी लिहा)

अर्ज करणारे चे नाव, वडिलांचे नाव ,वय ,तालुका जिल्हा ,अर्ज क्रमांक, आधार क्रमांक द्यायचे. मोबाईल क्रमांक, लिहायचे.

मला कुसुम टप्पा दोन सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 3 / 5 / 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा पंप मंजूर झाला आहे. व माझ्या बोरवेलची खोली 240, 400 जी काय खोली तुमच्या बोरवेलची असेल त्यामध्ये नमूद करायची आहे.

ऑनलाइन पद्धतीने तुम्ही ज्या कंपनीची निवड केली आहे. त्याची माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे.

मला माझ्या बोरवेलच्या खोलीबद्दल परिपूर्ण माहिती आहे. त्यानुसार मी दोनशे दहा(210) फूट सौर पंप बसवा असे लिहून देत आहे.

तसेच भविष्यात होणाऱ्या हवामानाच्या बदलानुसार बोरवेल मधील पाण्याच्या पातळीला अनुसरून मी वरील पंपाची निवड केलेली आहे. जर मला सौर पंपाचा उपसा न आल्यास किंवा कमी आल्यास कोणतेही तक्रार करणार नाही. कारण, मी स्वतः बोरवेल मध्ये बसवण्यात येणाऱ्या पंपाच्या खोलीची निवड केलेली आहे. यासाठी मी स्वतः सर्वस्वी जबाबदार आहे.

लाभार्थ्या ंसही, लाभार्थ्याचे गाव, दिनांक ,पत्ता

वरील लिहिलेले संमती पत्र कंपनीकडे सादर करायचे आहे.

टिप – : ज्या ठिकाणी कुसुम सोलार योजनेचा अर्ज केला आहे. त्या ठिकाणी जाऊन याची सर्व माहिती विचारावी. व शंभर रुपयाच्या बॉण्ड वर संमती पत्र लिहून द्यावे.

Leave a comment

error: