Kharif Crop Insurance 2022 | खरीप पिक विमा 2022

Kharif Crop Insurance 2022 संदर्भात आले नवीन अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना राज्य हिश्याचे होणार वितरण. हा निधी विमा कंपन्या दिल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरच मिळणार 2022 चा खरीप पिक विमा या संदर्भातील सविस्तर बातमी वाचा खालील प्रमाणे

खरीप पिक विमा 2022 वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे.

Kharif Crop Insurance 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालेलं होतं. खरीप 2022 मध्ये राज्यातील बऱ्याचश्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नुकसान झाले होते . या नुकसानी संदर्भात काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयामार्फत अधिसूचना काढून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे देण्यासाठी निर्देश देण्यात आले होते . अशा सर्व शेतकऱ्यांच्या समायोजनाचा पिक विमा आतापर्यंत बाकी होता .राज्यातील बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये वाटपाचे निर्देश देण्यात आलेले होते तर काही जिल्ह्यांमध्ये पिक कापण्याच्या अंतिम अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर झालेला होता आणि या शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे पैसे अद्याप पर्यंत देखील वाटप झालेले नाहीत.

अशा सर्व शेतकऱ्यांचे निधीचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 15 सप्टेंबर नंतर या पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिक विमा वाटप केले जाईल. अशा प्रकारचे ग्वाही देण्यात आली होती. राज्य शासनाला तशा प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. परंतु, आता देखील राज्य शासनाचा हिसा वितरित न झाल्यामुळे अनुदान वितरित न झाल्यामुळे पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिक विमा वाटपामध्ये उशीर केला जात होता आणि अखेर आता राज्य शासनाचा उर्वरित ह प्ता अनुदान आणखीन वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

Kharif Crop Insurance 2022 – : राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022 साठी 61 कोटी 52 लाख रुपयांचा उर्वरित पिक विमा अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्यासाठी 18 सप्टेंबर 2023 रोजी एक महत्त्वाचा जीआर निर्गमित केलेला आहे.

या शासन निर्णयानुसार राज्यातील

  • भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीला 41 लाख 64हजार 839 रुपये
  • बजाज आलाय जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीसाठी 52 कोटी 52 लाख 38हजार 837 रुपये
  • HDFC आरगो जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी पाच कोटी 23 लाख 99 हजार 493 रुपये
  • ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीसाठी दोन कोटी 26 लाख 74 हजार 988 रुपये
  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपनीसाठी एक कोटी सात लाख 57 हजार 824 रुपये

असे एकूण 61 कोटी 52 लाख 35 हजार 981रुपये राज्य शासनाच्या हिश्याचे उर्वरित अनुदान होते त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे.

याच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर, नांदेड , सोलापूर किंवा परभणी जिल्हा या सर्व जिल्ह्यांना पिक विम्याचे वाटप होईल अशी माहिती सांगण्यात येत होती.

पिक विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाला तशी माहिती दिली जात होती. परंतु आतापर्यंत हा निधी शेतकऱ्यांना वितरित झालेला नाही. आता हे अनुदान मिळाल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे.

याच्यामध्ये सर्वात जास्त अनुदान मिळालेली कंपनी आहे. ती म्हणजे बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी याच्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा जास्त प्रमाणात अनुदानाचा जास्त प्रमाणात प्रमाणात पीक विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. Kharif Crop Insurance 2022

पीक विमा वाटपाच्या संदर्भातील इतर काही महत्वाचे अपडेट किंवा खरीप पिक विमा 2023 सुद्धा आता विविध जिल्ह्याच्या अधिस ूचना काढण्याचे काम सुरूच आहे. खरीप पिक विमा 2023 चे सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान वितरित केले आहे तो सुद्धा पिक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.

खरीप पिक विमा 2023 संदर्भात जे काही नवीन अपडेट येतील ते सुद्धा तुम्हाला वेळच्यावेळी दिले जातील.

Kharif Crop Insurance 2022

खरीप पिक विमा 2022 संदर्भात जी माहिती आता मिळालेली आहे त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून कंपन्यांना त्यांच्या उर्वरित निधीचे वितरण केलेले आहे हा निधी कंपन्यांना मिळाल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2022 चा अनुदानाचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल धन्यवाद Kharif Crop Insurance 2022

Leave a comment

error: