कांदा अनुदान GR

कांदा अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी कांदा अनुदान संदर्भातील जीआर राज्य शासनाने जारी केलेला आहे.

पुढील प्रमाणे कांदा अनुदानाचे वितरण होणार.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने दिनांक 01 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीतील लेट खरीप हंगाम लाल कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रतिशतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने अनुदानापोटी रुपये 550 कोटी सन 2023 च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केले असून या रकमेतील 465.99 कोटी एवढी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. व उर्वरित रक्कम पुढीलटप्प्यात देण्यात येणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने ICICI बँकेमध्ये चालू खाते उघडले आहे. याच चालू खात्याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदान जमा करण्यात येणार आहे.

पैसे जमा करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पात्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड तसेच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट चे डिटेल्स घेण्यात आलेले आहेत. याद्वारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात कांदा अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

कांदा अनुदान

₹ 10 कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेले 13 जिल्हे या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची संपूर्ण रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
ते 13 जिल्हे पुढीलप्रमाणे – : नागपूर, रायगड, सांगली, सातारा ,ठाणे ,अमरावती , चंद्रपूर , बुलढाणा , वर्धा , यवतमाळ , वाशिम , अकोला , लातूर

₹ 10 कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेले 10 जिल्हे या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना 53.94% इतकी कांदा अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
ते 10 जिल्हे पुढील प्रमाणे – : उस्मानाबाद , नाशिक , पुणे , सोलापूर , अहमदनगर , छत्रपती संभाजी नगर , धुळे , जळगाव ,कोल्हापूर ,बीड

तसेच या योजनेखाली वित्त विभागाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित पात्र लाभार्थ्यास कांदा अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल.

राज्य शासनाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतच्या फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच ग्रामसभा /चावडी येथे वाचावी असे सांगण्यात आले आहे.

13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 22 कोटी 50 लक्ष 51 हजार 974 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 443 कोटी 37 लक्ष 33 हजार 994 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

या शासन निर्णयाने कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला आहे. हे कांदा अनुदान पुढील आठ ते पंधरा दिवसात पात्र /लाभार्थी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

Leave a comment

error: