Flood Compensation Approved | अतिवृष्टी भरपाई मंजूर 2023

Flood Compensation Approved – : वर्ष 2023 मध्ये जून व जुलै या महिन्याच्या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान तसेच शेत जमिनीचे नुकसान देखील झाले होते. मदत देण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय 3 आक्टोंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या जीआर च्या माध्यमातून 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1 हजार 71 कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. याच्या संदर्भातील सविस्तर माहिती

शासन निर्णय

  • जून ते जुलै 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधी मधून 1000 71 कोटी 77 लक्ष 1000 रुपये फक्त इतका निधी वितरणासाठी मंजूरी देण्यात येत आहे.

हा निधी खालील अकरा जिल्ह्यांना वितरित केल्या जाणार आहे.

निधी वितरणाचा तपशील

अमरावती

अमरावती – : अमरावती या जिल्ह्यातील 90255 एवढे शेतकरी बाधित असून 65 कोटी 31 लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे.

  • अमरावती या जिल्ह्यातील शेत जमिनीच्या नुकसानी करिता 24 लाख 39 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे.(51 हेक्टर नुकसान)

अकोला

अकोला – : अकोला या जिल्ह्यातील 2 लाख 571 शेतकरी बाधित असून 144 कोटी 28 लाख एवढा निधी वितरित केला जाणार आहे.

  • अमरावती या जिल्ह्यातील ४३७७ हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. त्याच्यासाठी 19 कोटी 85 लक्ष एवढा निधी मदत म्हणून वितरित केला जाणार आहे.

यवतमाळ

यवतमाळ – यवतमाळ या जिल्ह्यातील 263609 शेतकरी बाधित असून 185 कोटी 10 लक्ष एवढा निधी वितरित केल्या जाणार आहे.

  • यवतमाळ या जिल्ह्यातील 10757 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. त्याच्यासाठी 19 कोटी 76 लाख एवढा निधी मदत म्हणून वितरित केला जाणार आहे.

बुलढाणा

बुलढाणा – : बुलढाणा या जिल्ह्यातील 148423 शेतकरी बाधित असून 115 कोटी 40 लक्ष एवढा निधी वितरित केल्या जाणार आहे.

  • बुलढाणा या जिल्ह्यातील 12902 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. त्याच्यासाठी 35 कोटी 41 लक्ष एवढा निधी मदत म्हणून वितरित केल्या जाणार आहे.

वाशिम

वाशिम – : वाशिम या जिल्ह्यातील 60165 शेतकरी बाधित असून 47 कोटी 14 लक्ष एवढा निधी वितरित केल्या जाणार आहे.

  • वाशिम या जिल्ह्यातील 1929 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. त्याच्यासाठी तीन कोटी 47 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

Flood Compensation Approved अमरावती विभागातील 763023 शेतकऱ्यांसाठी 55726.44 नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

अतिवृष्टी भरपाई मंजूर 2023

जालना

जालना – : जालना या जिल्ह्यातील 282 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांसाठी 35 लाख 59 हजार एवढा निधी वितरित केल्या जाणार आहे.

परभणी

परभणी – : परभणी या जिल्ह्यातील 201 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांच्यासाठी 27 लाख 75000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

हिंगोली

हिंगोली – : हिंगोली या जिल्ह्यातील 27742 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। त्यांच्यासाठी 14 कोटी 54 लाख 28 हजार एवढी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

नांदेड

नांदेड – : नांदेड या जिल्ह्यातील 617911 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांच्यासाठी 420 कोटी 46 लाख 61 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

बीड

बीड – : बीड या जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांच्यासाठी 9 लाख 64 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

लातूर

लातूर – : लातूर या जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी 2 लाख 92 हजार दिले जाणार आहेत.

छत्रपती संभाजी नगर विभागातील 646295 शेतकऱ्यांसाठी 43574.79 नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

Flood Compensation Approved – : एकूण राज्यातील 1409318 शेतकऱ्यांसाठी 99301.23 नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
शेत जमिनीचे 30018.76 हे तर नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी 7875.78 नुकसान भरपाई दिले जाणार आहे.

Flood Compensation Approved – : लाभार्थ्यांना नुकसान भरपाई दिल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर टाकावी. अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या आहेत.

Flood Compensation Approved

निकष

  • 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असणे आवश्यक आहे.
  • 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले असणे आवश्यक आहे.

वरील सांगितल्याप्रमाणे निकषांमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हा मदतीचा निधी शासनातर्फे लवकरच दिला जाईल. धन्यवाद.Flood Compensation Approved

Leave a comment

error: