Employees Master Database

महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध शासन घेऊन आले , नियोजन विभागाचे परिपत्रक

राज्यातील नियमित आस्थापनेवरील व अनियमित आस्थापनेवरील कर्मचारी तसेच रोजंदारी अंशकालीन व तसेच नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वांकष माहितीकोश जमा करण्यात येणार आहे. या सर्व कर्मचाऱ्या बाबतचे शासन परिपत्रक नियोजन विभागाने जारी केले.

Employees Master Database -: महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश दरवर्षी अद्यावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या विभागा द्वारे हाती घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या रिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोश अद्यावत ठेवण्याबाबत निर्णय झालेला आहे.

# Employees Master Database #

–> कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहिती कोश <–

 • Employees’s Service I.D.
 • भविष्य निर्वाह निधी pf
 • DCPS खाते क्रमांक
 • pan number
 • आधार क्रमांक
 • कर्मचाऱ्यांची संपूर्ण नाव
 • जन्मदिनांक
 • लिंग
 • कर्मचाऱ्यांची जात
 • सामाजिक प्रवर्ग
 • धर्म
 • दिव्यांग व्यक्ती
 • सेवेतून झाल्याचा दिनांक
 • सेवेत रुजू झाल्यानंतरचे पद नाम
 • कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक
 • कर्मचाऱ्याचा ईमेल आयडी
 • सेवानिवृत्तीचा दिनांक
 • स्थायी स्वरूपात हे सर्व माहिती गोळा करण्यात येणार आहे.

–> नोंदणी <–
सर्व कर्मचाऱ्यांचे माहिती नोंदणी करिता अर्थ व सांख्यिकी संचालनायक मुंबई कडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली वापरण्यासंबंधीचे सूचना संच सर्व संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येतील तसेच लॉगिन आयडी व पासवर्ड द्वारे माहिती भरावयाची आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश 2023 राज्य शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी पुढील वेळापत्रक व सूचना नुसार चारही करण्या बाबत कळवण्यात आले आहे.

–> वेळापत्रक <–

–> तपशील <–
1) Login id व Password संचालनालयाने उपलब्ध करून देणे .

2) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी माहिती सादर करणे व पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून देणे.

3) आहरण व संवितरण अधिकाऱ्याने त्रुटी निवारण करून माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे.

–> कालावधी <–
1) दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक 31 ऑगस्ट 2023

2) दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2023

3) दिनांक एक डिसेंबर 2023 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2024

Leave a comment

error: